बुलढाणा (बाळू वानखेडे) – मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती विभाग यांनी अमरावती विभागातील गट कमधील वनपाल संवर्गातील ५० वनपालांच्या बदल्या २३ मेरोजी केल्या आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील श्रीकृष्ण बोबडे, सदाशिव वाघ, नीलेश राठोड यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे.
जी. के. अनारसे, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक विभाग अमरावती यांनी २३ मे रोजी विभागातील जवळजवळ ५० वनपालांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नऊ जणांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने नीलेश रामसिंग राठोड वनपाल विभागीय कार्यालय बुलढाणा यांची वनपाल सामाजिक वनीकरण लोणार, राहुल गुलाबराव चव्हाण वनपाल बुलढाणा वर्तुळ बुलढाणा यांची मध्यवर्ती रोपवाटिका वड़ाळी अमरावती, श्रीकांत रामधन सातव वनपाल विशेष सेवा विभागीय कार्यालय बुलढाणा यांची माटरगाव वर्तुळ खामगाव, संजय हरिदास राठोड वनपाल टिटवी वर्तुळ मेहकर यांची ड़ोंगरखंड़ाळा वर्तुळ बुलढाणा, दीपक गोपाल शेगोकार वनपाल पूर्व वर्तुळ खामगाव यांची लोणार अभयारण्य मेहकर, यशवंत गणेशराव देशमुख वनपाल माटरगाव वर्तुळ खामगाव परीक्षेत्र यांची सामाजिक वनीकरण नांदुरा, संतोष राणोबा गिरनारे वनपाल पश्चिम खामगाव वर्तु यांची सामाजिक वनीकरण तेल्हारा जि. अकोला, श्रीकृष्ण यशवंत बोबडे वनपाल मांड़वा वर्तुळ घाटबोरी यांची बोथा वर्तुळ खामगाव व सदाशिव उत्तमराव वाघ वनपाल गणेशपूर वर्तुळ खामगाव यांची बदली सामाजिक वनीकरण परिश्रेत्र अकोट येथे बदली झाली आहे. बदली झालेल्या कर्मचार्यांना स्थानिक व्यवस्था करून तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश अक्षय गजभिये उपवनसंरक्षक बुलढाणा यांनी २४ मे रोजी काढले आहेत.