Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

घरजवळ आले असतानाच चालकाला डुलकी लागली, तिघे जागीच ठार!

शेगाव (तालुका प्रतिनिधी) – पंढरपूर, तुळजापूर देवदर्शन करून रात्रभर प्रवास करत शेगाव येथे घरी परतणार्‍या भाविकांच्या क्रूझर गाडीला शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव असलेली ही गाडी देशमुख पेट्राेलपंपजवळील स्वागत कमानीला धडकली. या दुर्देवी अपघातात तीन भाविक जागीच ठार झाले असून, सात जण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अकोल्याला हलविण्यात आलेले आहे. अपघातातील मृतक व गंभीर जखमी हे चिचखेड, मच्छिंद्रखेड येथील रहिवासी आहेत.

शेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर ही भरधाव क्रूझर गाडी धडकली. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले होते. सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. तर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोल्यात हलवण्यात आले आहे. क्रूझर चालकाला झोप लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले अन् हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारण, रात्रीपासून या गाडीचा प्रवास सुरु होता. विशेष म्हणजे, पीडित कुटुंबीय हे त्यांच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असतानाच हा दुर्देवी प्रकार घडला.

या दुर्देवी अपघातात पूर्वा नितीन ठाकरे (वय २३), परशुराम लांजुळकर (वय ३० रा आळसणा), सुनंदा गजानन झोटे (वय ४१) हे जागीच ठार झाले. तसेच स्वामिनी हरिदास भारंबे (वय २४) रा मच्छिंद्रखेड, शीतल अक्षय भारंबे (वय ३०), प्रांजली दत्तात्रय पारस्कार रा. सावळा, सागर विलास साठे (वय ३०) रा. तरोडा डी, शुभांगी सागर झाटे, ज्योती ज्ञानेश्वर भारंबे (वय ३९) रा. मच्छिंद्रखेड, ज्ञानेश्वर वसंता भारंबे (वय ३०) रा. मच्छिंद्रखेड, ओवी अक्षय भारंबे (वय एक वर्ष) श्लोक नितीन ठाकरे (वय १३) योगीराज सागर घाटे (वय २ वर्ष), सार्थक अक्षय भारंबे (वय ६ वर्ष), अक्षय वसंत भारंबे (वय ३८) रा. मच्छिंद्रखेड, नितीन ठाकरे (वय ३५) रा. कोदरी, जिजाबाई वसंता भारंबे (वय ४५) रा. मच्छिंद्रखेड, प्रमिला पाटील (वय ४५) रा. टाकळी हे गंभीर जखमी झालेले असून, जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अकोला येथे हलविण्यात आलेले आहे.


मच्छिंद्रखेड, तरोडा डी येथील असलेले हे महिला व पुरूष भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर, तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनाहून घराकडे परतले असता, शेगावजवळ वाहनाचा अपघात झाला. या अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झालेले आहे. रात्रभर या वाहनाचा चालक वाहन चालवत होता. त्याला झोप येत होती. परंतु घर आता अवघ्या काही मिनिटांवर आहे, म्हणून तो तसाच वाहन चालवत राहिला. परंतु घरी पोहोचायच्या काही वेळ आधी हा अपघात झाला.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!