– फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट, घोषणांनी आसमंत दणाणला!
साकेगाव (संजयनाथा निकाळजे) – नव्यानेच बसविलेल्या साकेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसर सौंदर्यीकरणासाठी पाच लक्ष रुपये तर भविष्यात उभारण्यात येणार्या बुद्धविहारासाठी दहा ते पंधरा लक्ष रुपये देण्याचे आश्वासन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी दिले. तर त्याचे भूमिपूजन येणार्या १४ एप्रिल रोजी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तथागत बहुउद्देशीय संस्था साकेगाव यांच्यावतीने शासनाची रीतसर परवानगी घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार, दि. २० मे रोजी आ. महाले यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. तत्पूर्वी सकाळी समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर भन्ते दीपंकर यांनी धम्म ध्वजारोहण करून धम्मध्वज गीत सादर केले. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत मधील महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आ. श्वेता महाले यांचेसह भाजपाचे प्रतापसिंह राजपूत, कृष्णा सपकाळ, सरपंच उर्मिला पवार, उपसरपंच देविदास लोखंडे, पिरीपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, वंचित बहुजन आघाडीचे नेते अर्जुन बोर्डे, शहराध्यक्ष बाळू भिसे, रायपूरचे ठाणेदार राजवंत आठवले, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव संजयनाथा निकाळजे, तालुका सचिव महेंद्र हिवाळे, माजी सैनिक संजीव भटकर, अभिमन्यू निकाळजे, महाराष्ट्र पोलीस संघशील निकाळजे, एसआरपीएफ जवान बाळकृष्ण निकाळजे, निलेश निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते गजानन अवसरमोल, परमेश्वर निकाळजे, रितेश पवार, फकीरा निकाळजे, परमानंद निकाळजे, ग्रामसेवक सुभाष वीर, रायपूर पोस्टचे अमोल गवई, समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख एकनाथ बोर्डे, संबोधी संस्थेचे एस एस गवई सर, ग्रामपंचायत सदस्य मगुल बी हिराखा, सुधाकर माघाडे आदींच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
अनावरण प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट, घोषणांचा आवाज निनादच होता. यावेळी उपरोक्त मान्यवरांचा तथागत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र निकाळजे, उपाध्यक्ष राहुल निकाळजे, सचिव श्रीकृष्ण निकाळजे, सहसचिव विजय निकाळजे, कोषाध्यक्ष पंजाबराव निकाळजे, सदस्य अशोक निकाळजे, प्रदीप निकाळजे, विष्णू निकाळजे, वसंता निकाळजे, यांचेसह गावकर्यांनी तथा महिला मंडळांनी स्वागत केले. यावेळी पुढे बोलताना आमदार श्वेता महाले म्हणाल्या की, संविधानाच्या माध्यमातून आज सर्वांना समान न्याय अधिकार मिळत आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे कार्य हे अनमोल असून, संविधानामुळे मातृशक्ती सुद्धा प्रबळ बनली आहे. या ठिकाणी तथागत संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र निकाळजे आणि पदाधिकार्यांची चळवळ बघता त्यांनी बाबासाहेबांचा पुतळा उभारून एक महान कार्य करून दाखवले. त्यामुळे ते निश्चितच अभिनंदन पात्र ठरतात. नवीनच बसवलेल्या या पुतळ्याच्या सौंदर्य करण्यासाठी पाच लक्ष रुपये तर बुद्ध विहारासाठी दहा ते पंधरा लक्ष रुपये देण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाई विजय गवई यांनी डॉ बाबासाहेबांना पुतळ्यामध्ये न बघता त्यांचे विचारदेखील आत्मसात केले पाहिजेत. यावेळी त्यांनी या परिसरामध्ये बुद्ध विहार नसल्याने येथे बुद्ध विहार उभारण्याचे संकल्पना मांडून आमदार महोदयांना विनंती केली. तर या गावात अनेकांनी पदे भूषविली मात्र त्यांना जे जमले नाही ते तथागत संस्थेच्या पदाधिकार्यांनी केली असल्याचे सांगितले. रायपूर पोस्टचे ठाणेदार राजवंत आठवले यांनी बाबासाहेबांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन वेळप्रसंगी लायब्ररीमध्ये सर्वात अगोदर जाऊन सर्वात उशिरा येणारे ती विद्यार्थी होते. त्यांनी पावाचे तुकडे खाऊन संघर्षमय जीवन व्यतीत केले. आणि आपल्याला संविधानाच्या माध्यमातून अधिकार बहाल केले. साकेगाव येथील मंडळींनी खर्या अर्थाने बाबासाहेबांच्या संविधानाप्रती आदर ठेवून व त्याचे पालन करून रीतसर शासनाकडून परवानगी घेऊन बाबासाहेबांचा पुतळा आज या ठिकाणी उभारला. बाबासाहेबांना पुतळ्यातच न ठेवता त्यांचे विचार अनुसरून शिक्षणाकडे देखील आपण भर दिला पाहिजेत, असे सांगितले.
यावेळी प्रतापसिंह राजपूत, अर्जुन बोर्डे, बाळू भिसे, प्रशांत डोंगरदिवे, ज्योती अवसरमोल यांनी आपले विचार व्यक्त केले, प्रास्ताविक ग्रामसेवक सुभाष वीर यांनी केले तर शेवटी सर्वांचे आभार तथागत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र निकाळजे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी समता सैनिक दल पदाधिकारी, धम्म उपासक, उपासिका यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.