Head linesPachhim Maharashtra

सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांचे निलंबन रद्द!

सोलापूर (संदीप येरवडे) – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी निलंबित केलेल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाचा आदेश रद्द करण्यात आला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह त्यांच्या सोलापुरातील कार्यकर्त्याला मोठा धक्का बसला आहे.

डॉ. जाधव यांचे निलंबन रद्द झाल्याबाबत शासनाने आदेश जारी केले आहेत. या आदेशात नमूद केलेल्यानुसार ज्याअर्थी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांना निलंबीत करण्यात आले होते व निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे ठेवण्यात आले होते. आरोग्यमंत्र्याच्या या निर्णयाविरुद्ध डॉ. जाधव यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटच्या आदेशाचे सरकारला दखल घ्यावी लागली आहे. त्यानंतर शासनाने २१.०४.२०२३ अन्वये त्यांचे मुख्यालयात सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्टरोग कार्यालय, सोलापूर असा बदल करण्यात आला होता. डॉ.शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांना पुनःस्थापनेनंतर सहायक संचालक, (कुष्ठरोग) अधिकारी, धुळे या रिक्त पदावर पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी किरकोळ कारणावरून डॉ. जाधव यांना निलंबित केले होते.

दरम्यान, आरोग्य अधिकारी जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर त्याच्याबाबत काही डॉक्टर मंडळींनी चुकीचे केले असल्याचे मत व्यक्त केले, तर काही डॉक्टर मंडळी म्हणाले, अशा बेजबाबदार अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई केली ती योग्यच केली, अशी प्रतिक्रिया उमटली होती. मॅटमधून आरोग्य अधिकारी जाधव हे जरी निर्दोष होऊन मुक्त झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यात आरोग्य अधिकारी म्हणून नेमणूक करु नये, असा सूर निघत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!