BULDHANAMEHAKARVidharbha

मेहकर बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींच्या १८ मेरोजी निवडी!

बुलढाणा/मेहकर (बाळू वानखेडे) – अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मेहकर बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी १८ मेरोजी निवड़णूक होत आहे. दरम्यान, सभापतीपदी खा.प्रतापराव जाधव यांचे भाऊ माधवराव जाधव यांची वर्णी लागण्याचे जवळपास निश्चित असून, प्रतापराव जाधव ठरवतील त्यांचीच उपसभापती पदीदेखील निवड़ होणार आहे.

जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांची निवड़णूक २८ व ३० एप्रिलरोजी पार पड़ली. यामध्ये मेहकर बाजार समितीची निवड़णूकदेखील २८ एप्रिलला झाली. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या निवड़णुकीत खा.प्रतापराव जाधव व आ.ड़ॉ.संजय रायमुलकर यांचे भूमिपूत्र पॅनल अर्थात शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाचे नेते आशीष दिलीपराव राहाटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीमध्ये रंगतदार लढत झाली. यामध्ये खा.जाधव व आ. रायमुलकर यांना सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, तरीही प्रतापगडाला हादरे बसलेच. अपेक्षितपणे अटीतटीच्या झालेल्या या निवड़णुकीत शिवसेना शिंदे गटाला ११ तर महाआघाडीला सात जागा मिळाल्या. या बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी १८ मेरोजी निवडणूक होत आहे.

सभापतीपदी खा. प्रतापराव जाधव यांचे भाऊ माधवराव जाधव यांची वर्णी जवळपास निश्चित असल्याचे सांगण्यात येत असले तरी खा. जाधव काही धक्कातंत्र वापरतात का? याकड़ेदेखील तालुक्याचे लक्ष लागले आहे. उपसभापती पदीही खा. जाधव म्हणतील त्यांचीच निवड़ होणार आहे. उपसभापती पदासाठी बबन भोसले, अरविंद दळवी, माधव वाघसह इतरांची नावेही चर्चेत आहेत. दरम्यान, मेहकर बाजार समितीत शिंदे गटाला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे निवड़णूक अविरोध होणार का? याकड़ेदेखील जाणकारांचे लक्ष लागले आहे. सभापती, उपसभापती निवड़णूक बाबतच्या नोटीस संबंधितांना बजावण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवड़णूक निर्णय अधिकारी गजानन फाटे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!