– १ ते १० जुलैदरम्यान जिल्हा बँकेचा आर्थिक डिजिटल सप्ताह
चिखली (तालुका प्रतिनिधी) – नाबार्ड व दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, म. बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक व डिजिटल साक्षरता सप्ताह निमित्त दि. ०१ जुलै ते १० जुलै या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये एकूण २२० आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी आज (दि.६) मेरा बु. शाखेअंतर्गत ग्राम अंत्री खेडेकर येथे आर्थिक साक्षरता मेळावा व कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी गावातील मान्यवर, शेतकरी सभासद व ग्रामीण उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांना आर्थिक साक्षरता व डिजिटल व्यवहारासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांपैकी काही मान्यवरांनी स्वयंस्फूर्तीने आपले मनोगत व्यक्त करून नाबार्ड व जिल्हा बँके प्रति आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक प्रकाश खेडेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाधान खेडेकर, अध्यक्ष ग्रामसेवा सोसायटी सुनील पाटील व उपाध्यक्ष साहेबराव पाटील व संचालक मंडळातील भागवत खेडेकर, बबनराव खेडेकर, प्रल्हाद पाटील, उद्धवराव पाटील, बाळू पाटील, संदीप पाटील व सर्व संचालक आणि गावातील सभासद हजर होते. प्रकाश खेडेकर यांनीसुद्धा आपल्या भाषणातून डिजिटल क्रांती बाबत चांगले मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास अधिकारी ए.बी. बंगाळे यांनी केले, आर्थिक व डिजीटल व्यवहार या बाबतीत एस. एस. पडघान शाखा व्यवस्थापक यांनी माहिती दिली. बँकेच्या योजना या विषयाची माहिती ए. पी. रिंढे रोखपल यांनी दिली, त्यानंतर आर. एन. निकाळजे गटसचिव, जी. के. पडघान शिपाई यांनी गावातील सभासदांना विनंती केली की आपल्या परिसराच्या विकासासाठी आपल्या जिल्हा बँकेच्या सोबत व्यवहार करावा व बँकेच्या कामात सहकार्य करावे. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ए. पी. रिंढे यांनी केले.
Leave a Reply