– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते भाजपच्या प्रचाराला!
बेंगळुरू (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी गेल्याने चर्चेत आलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता जाण्याचे संकेत एक्झिट पोलमधून प्राप्त होत आहेत. एकूण नऊ एक्झिट पोलपैकी सर्वच पोल्सने कर्नाटकात काँग्रेसची सत्तावापसी होण्याचे सर्वेक्षण अंदाज वर्तविलेले आहेत. कर्नाटकच्या २२४ विधानसभा जागांसाठी आज मतदान पार पडले असून, ७०.६९ टक्के मतदान झालेले आहेत. एक्झिट पोल्सच्या अनुसार, भाजप ९२ जागा, काँग्रेस १०७ जागा, जनता दल (सेक्युलर) २० व अन्य पक्षांना ५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. विधानसभेत बहुमतासाठी ११३ संख्याबळ गरजेचे आहे.
————