वाशिम (जिल्हा प्रतिनिधी) – मंगरूळपीर शहरातील व ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमण नियमानकुल करणे व प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्के घरकुल बांधून देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह ग्रामीण भागातील शेतीच्या अतिक्रमणावर सन २०२२-२३ च्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी घेण्याबाबत स्थानिक महसूल प्रशासनाला निर्देश देण्यात यावे, या मागणीसाठी दलित पँथरच्यावतीने तहसीलवर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीशकुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात युवानेते आशीष इंगोले यांनी केले.
मंगरूळपीर शहरातील तसेच ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया रखडलेली आहे. तेव्हा ही अतिक्रमणे तातडीने नियमनाकुल करून त्यांच्यावर पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरे बांधून द्यावीत आणि अतिक्रमीत शेतीवरील पेरणीची महसूल दप्तरी नोंद घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता. तो आशीष इंगोले यांच्या नेतृत्वात तहसीलवर धडकला. या मोर्चात मोठ्या संख्येने दलित, आदिवासी व गोरगरीब नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकरांनी तहसीलदारांना आपले निवेदन दिले.
Leave a Reply