BULDHANAMEHAKARVidharbha

मेहकरचे तहसीलदार संजय गरकल यांची अचलपूरला बदली

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य सरकारने अमरावती विभागातील तहलदारांच्या आज, ८ मेरोजी बदल्या केल्या असून, जिल्ह्यातील मेहकरचे तहसीलदार संजय गरकल यांची अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे तहसीलदारपदी बदली झाली आहे.

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने अमरावती विभागातील तहसीलदार संवर्गाच्या आज, ८ मे रोजी बदल्या केल्या आहेत. यामध्ये मेहकरचे तहसीलदार संजय श्रीराम गरकल यांची अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. तहसीलदार संजय गरकल संयमी तसेच कमी बोलणे व काम करणारा अधिकारी म्हणून परिचीत आहेत. तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील तहसीलदार श्रीमती प्रिया तानाजी सुळे यांची अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथेच बदली करण्यात आली आहे. मारेगाव जि. यवतमाळ येथील तहसीलदार दीपक पुंड़े यांची मालेगाव जि. वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. मेहकर येथे कोण तहसीलदार येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!