चिखली ग्रामीण (प्रतिनिधी) – तालुक्यातील गुंजाळा येथे काही हाकेच्या अंतरावर निसर्गमय वातावरणाच्या ठिकाणी बाळू गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून भव्यदिव्य खंडोबा मंदिराचे बांधकाम करून आकर्षक अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता, आणि काल याच मंदिरावरील कलशरोहणाचा सोहळा पार पडला. यानिमित्त मंगल कलशाची गावातून भव्य मिरवणूक काढून गावातील सुधाकर वनवे यांच्याहस्ते कलशरोहणाचा विधी पार पडला, त्यांच्याहस्ते कलशारोहण झाले.
चिखली तालुक्यातील गुंजाळा गावातील तसेच मेरा बुद्रूक येथील भाविक भक्त, भजनी मंडळींनी टाळ-मृदंग, तसेच ढोल ताशाच्या गजरामध्ये कलश पालखीत ठेवून संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक सुरू असतांनाच प्रत्येक गल्लीत महिलांनी घराघरापुढे काढलेल्या आकर्षक रांगोळी आणि कलशाचे पूजन करीत खडोबा मंदिरांवर वाजतगाजत हा मंगल कलश नेण्यात आला. यावेळी मंदिरात पूजा, अभिषेक, होमहवन आदी धार्मिक विधी करून सुधाकर वनवे यांच्याहस्ते कलशारोहण करण्यात आले. कलशारोहण होताच शेकडो भाविक भक्तांनी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत आनंद साजरा केला.
यावेळी बाळू गावडे, निवास मोरे, विठोबा मोरे, बंडू केदार, सोनू इंगळे, संजय गायकवाड, गजानन दाताळ, किशोर निंबाळकर, शेषराव तायडे, नामदेव काळे, संजय पडघान, काकड, माजी सरपंच दीपक केदार, पत्रकार प्रताप मोरे, श्रीराम केदार, गजानन केदार, सुधाकर वणवे, सुनिल आटोळे, नारायण मोरे, सौदा केदार, परसराम नागरे, बबन वाघमारे, सुनिल मोरे, बंडू गवई, युवराज खिल्लारे, अंकुश केदार, बबन सावकार, सिध्दार्थ गवई, बबन मोरे, विजयानंद मोरे, अरूण मोरे, बंडू घुगे, वामन बिबे, गणेश केदार, दयानंद गवई, अशोक मोरे आदी गावकर्यांसह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.