LONARVidharbha

बिबखेड येथील तरूणाची भुमराळा येथे गळफास घेऊन आत्महत्या!

बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील भुमराळा येथे सचिन संतोष राठोड (वय २४) या तरूणाने शेतातील आपट्याच्या झाडाला रूमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन हा देऊळगावमही येथे जेसीबीवर चालक होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून, बिबी पोलिस अधिक तपास करत आहेत. मृतक हा बिबखेड येथील रहिवासी असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बिबखेड (ता. लोणार) येथील गजानन गुलाबराव राठोड यांनी या घटनेबाबत बिबी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तोंडी तक्रारीनुसार, सचिन संतोष राठोड याने त्यांच्या भुमराळा तालुका लोणार शिवारातील शेतात बांधावर असलेल्या आपट्याच्या झाडाला रूमलाच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यांचे आई-वडील त्यांच्या शोधात गेले असता, त्यांना त्यांचा मुलगा सचिन हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. सचिन हा देऊळगावमही, तालुका देऊळगावराजा येथे जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होता. तो तिकडेच रूम करून देऊळगावमही येथे राहत होता, अधूनमधून गावीसुद्धा येत होता. त्याने गळफास कशामुळे घेतला हे अद्याप स्पष्ट झाले नसून, बिबी पोलीस स्टेशन येथे मर्ग कलम १७४ जाफौ याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कायंदे हे करित आहेत.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!