आळंदी (अर्जुन मेदनकर) : इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणास शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांना पाठिंबापत्र माजी खेड तालुका प्रमुख उत्तम गोगावले यांचे हस्ते देण्यात आले.
शिवसेना आळंदी शहर संघटक आनंदराव मुंगसे, माजी तालुका प्रमुख श्रीमती अनिता झुजम यांनीदेखील उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शिवसेना शहर प्रमुख अविनाश तापकीर, उपशहर प्रमुख शशिकांतराजे जाधव, राहुल सोमवंशी, मंगेश तिताडे, शाखा प्रमुख राकेश जाधव, युवा सेना उपशहर प्रमुख चारुदत्त रंधवे, रोहन महाजन, आशिष गोगावले, शिवसेना महिला आघाडी भारती वाघमारे, योगिता धुमाळ, शुभांगी यादव, संतोषी पांडे, शैला तापकीर, अनुसया संगेवार, वनिता उंडारे, राजश्री, संगीता मेटे,विद्या आढाव, कल्याणी मालक, नकुसा पुजारी, अभिषेक आढाव, ऋषिकेश लिपणे आदी उपस्थित होते.
येथील इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने आळंदीत महाद्वार प्रांगणात इंद्रायणी नदी संवर्धन व स्वच्छ रहावी यासाठी सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. अशी माहिती आळंदी शहर मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी दिली. आळंदी जनहित फाउंडेशनतर्फे देखील अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी पाठिंबा जाहीर करून निवेदन देत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे लक्ष वेधले आहे. इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न आपण सर्व नागरिक, भाविक आणि आळंदीकर यांनीही करावा, असे आवाहन तापकीर यांनी केले आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ व्हावी यासाठी आंदोलनाला पाठिंबा देत असून सर्वानी यात सहभागी व्हावे असे आवाहन तापकीर यांनी केले आहे. या प्रसंगी मंगेश काळे, सचिन लोखंडे, मोहन शिंदे, भाजपाचे विनोद कांबळे, नीरज कुर्हाडे आदी उपस्थित होते.
आंदोलन कर्त्यांच्या मागण्यांमध्ये इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासणे, नदी प्रदूषित करणार्या घटकांवर कायदेशीर कारवाई करणे, प्रदूषित पाणी नदीत न सोडणे, दोषीं कंपन्यावर कारवाई करणे, इंद्रायणी नदी प्रदूषण रोखू न शकलेल्या संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई करणे, जलपर्णी मुक्त इंद्रायणी साठी हलगर्जीपणा केलेल्या अधिकारी यांचेवर कारवाई करणे, जलपर्णी मुक्त इंद्रायणीसाठी शासनाने प्रभावी कामकाज करणे. नदीच्या उगमापासून संगमा पर्यंतच्या गावांचे सांडपाणी नदी सोडू नये. यासाठी ठिकठिकाणी एसटीपी प्लँट विकसित करण्याच्या मागण्याचा समावेश आहे.