Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

दुधनी, अक्कलकोटनंतर सोलापूर बाजार समितीवर भाजपचा डोळा!

सोलापूर (संदीप येरवडे) – अक्कलकोट व दुधनी या दोन बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. यामुळे आता सोलापूरच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये देखील असा चमत्कार करण्याची आखणी सध्या भाजपकडून सुरू आहे.

राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची बाजार समिती म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळखली जाते. सध्या सोलापूरच्या बाजार समितीची सूत्रे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे जरी असले तरी त्यांना सभापती करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. मागील निवडणुकीमध्ये माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतील नेते व त्यांच्याच पक्षातील माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे लढले होते. या निवडणुकीमध्ये माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पराभव स्वीकारावा लागला होता. तर महाविकास आघाडीतील माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे नेते बळीराम साठे यांच्या गटाशी हात मिळवणी करुन विजयकुमार देशमुख यांना निवडून येऊन व सभापती चे सूत्रे हाती घेता आले. परंतु यंदाच्या सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मागील निवडणुकीचे चित्र पाहता भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वास्तविक पाहता, दक्षिण सोलापूर तालुक्यात विविध कार्यकारी विकास सोसायटीवर सर्वाधिक काँग्रेसचे सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व आहे. तर उत्तर सोलापूर तालुक्यात माजी आमदार दिलीप माने यांच्या देखील अनेक विकास सोसायट्यावर वर्चस्व आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते काका साठे यांच्या देखील ताब्यात काही संस्था आहेत. त्यामुळे माने, साठे हसापुरे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपला महाविकास आघाडीतील नेत्याशी एक तर हात मिळवणी करावे लागेल, किंवा भाजप पक्षात घ्यावे लागेल. तेव्हाच सोलापूर बाजार समितीमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळविता येणार आहे. अन्यथा, भाजपने स्वतंत्र लढले तर सोलापूर बाजार समितीमध्ये एक हाती सत्ता मिळवणे अशक्य असल्याची चर्चा आहे. परंतु दुधनी, अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र पाहता भाजप पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. तसा प्रयोग भाजप सोलापूरच्या बाजार समितीच्या निवडणूक मध्ये करेल का?


भाजपचे तीन आमदार लावणार जोर!
सोलापूर बाजार समितीमध्ये भाजपची एकहाती सत्ता मिळवण्यासाठी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी है तीन आमदार जोर लावण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्याकडे संस्थाचे जाळे अधिक असले तरी यांच्यामध्ये अंतर्गत ओढाओढीच्या राजकारणाचा फायदा भाजपला अलगद होणार आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!