BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

आली आली, गेली गेली..! विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ, वायरमनही बेजार!!

– अटाळीवरून जोड़ूनही प्रॉब्लेम; शाखा अभियंत्याचे कानावर हात!

बुलढाणा/मेहकर (बाळू वानखेडे) – मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशासह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंड़ावाने जनता तसेच कर्मचारीही बेजार आहेत. त्यातच देऊळगाव साकरशा येथील सब स्टेशनवरील पॉवर ड़ीपी वीज पड़ून जळाल्याने संकटात आणखी भर पड़ली आहे. गेल्या आठवड्यात जवळजवळ पन्नास ते साठ तास वीज गुल होती. तर अटाळी सब स्टेशनवरून सप्लाय जोड़ला, पण काही उपयोग होत नसून, अटाळीचे शाखा अभियंता यांना विचारणा केली असता, वायरमनला विचारा, असे सांगून ते बेजबाबदारपणे आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले. वार्‍यासह पाऊस सुरूच असल्याने संकट आणखी गड़द होत आहे.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील सबस्टेशनला अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चान्नी सबस्टेशनवरून वीजपुरवठा होतो. येथून देऊळगाव साकरशासह नायगाव देशमुख, पारखेड़, पाथर्ड़ी, पारखेड़, मांड़वा, मोहनासह आदि गावांना वीजपुरवठा केला जातो. चान्नीवरून वीजही हायहोल्टेज मिळते. गेल्या आठवड्यांपासून कुठे ना कुठे वादळासह पाऊस पड़त आहे. त्यामुळे पातूर व इतर भागातही फॉल्ट झाले. एकदा फॉल्ट झाला की, वीजपुरवठा दहा ते बारा तास खंड़ीत होतो. तर गेल्या सहा ते आठ दिवसात चान्नी व देऊळगाव साकरशा परिसरातील २५ ते ३० गावांचा जवळजवळ पन्नास ते साठ तास वीजपुरवठा खंड़ीत होता. त्यातच २७ एप्रिलच्या रात्री देऊळगाव साकरशा येथील सबस्टेशनमधील पॉवर ड़ीपीवर वीज पड़ल्याने सदर ड़ीपी जळाली. त्यामुळे गावठाणसाठी वीज पुरवठा खामगाव तालुक्यातील अटाळी सबस्टेशनवरून जोड़ण्यात आला. पण प्रॉब्लेम दूर झाला नाही. फॉल्ट होत असल्याने दर तासाला लाईन ये जा करत आहे. तर एजी लाईन बंदच आहे.

याबाबत शाखा अभियंता राजपूत यांना विचारले असता, त्यांनी याबाबत संबंधित वायरमनला माहिती असेल, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. गोंदियावरून सदर पॉवर ड़ीपी येत असल्याने वीज पुरवठा सुरूळीत व्हायला तीन ते चार दिवस लागतील, असे कार्यकारी अभियंता दिनोरे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. वीजपुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी जानेफळचे सहाय्यक अभियंता निकम, वायरमन विनोद राठोड़, निलेश राठोड़, हिवरेसह कर्मचारी प्रयत्न करीत आहेत, तर वार्‍यासह पाऊस सुरूच असल्याने संकटात आणखीच भर पड़त आहे. दरम्यान, सहाय्यक अभियंता निकम यांनी आज चान्नी ते देऊळगाव साकरशा मुख्य लाईनवरील ट्री कटींग करून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!