Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbai

देशात मान्सून सक्रीय, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत जोरदार पाऊस

– पहिल्याच जोरदार पावसात मुंबई तुंबली
– अमरावतीत नद्यांना महापूर

  • महत्वाचे अपडेट
    १. जोरदार पावसाने अमरावती जिल्ह्यात महापूर
    २. पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु असून, महाबळेश्वरला तर पावसाने झोडपून काढले आहे. पहिल्याच पावसात धरणे भरण्यावर आली आहेत.
    ३. अंधेरी, वाशी, ठाणे, नवी मुंबई, खारघर या उपनगरांत पावसाने रस्ते तुंबले असून, वाहतूक ठप्प झाली होती.
    ४. घाटकोपर, कुर्ला येथे भूस्खलन
  • 5. काेकणातील नद्यांनी धाेक्याची पातळी ओलांडली, अनेक रस्ते बंद
  • 6. काेल्हापुरात एनडीआरएफची पथके तैनात

मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – नैऋत्य मोसमी वारे घेऊन आलेला मान्सून देशभरात जोरदार कोसळत आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीसाठी तर हवामान खात्याने ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस कोसळत होता. पुढील काही दिवस असाच पाऊस कायम राहील, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. अनेक जिल्ह्यात महापूर आला असून, काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. बस व रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

पहिल्याच जोरदार पावसाने मुंबई तुंबली असून, ठीकठिकाणी पाणी साचले होते. मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत असून, मागील ४८ तासांत ७८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. समुद्रकिनारी राहणार्‍या नागरिकांना सावधानतेचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. या मोसमात पहिल्यांदाच देशभर सर्वदूर पाऊस सुरु असून, अरबी समुद्र, ओडिशा व दक्षिण झारखंडमध्ये तर तुफान पाऊस सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!