Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPolitics

राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार!

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – सर्वसामान्यांच्या खिशावरील भार कमी करण्यासाठी राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील मूल्यावर्धीत कर (व्हॅट) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, हे राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलू, अशी घोषणाही शिंदे यांनी केली.
विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, की पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट लवकरच कमी करण्यात येतील. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. केंद्रातील मोदी सरकारने दोन वेळेस या करात कपात केली होती. परंतु, राज्य सरकारने करकपात केली नव्हती. त्यामुळे राज्यात इंधन महाग होते. ते स्वस्त करण्यासाठी शिंदे सरकारने पाऊल उचलले आहे. या शिवाय, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीच्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २१ कोटी रुपये निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवेशपूर्ण भाषण करत, शिवसेनेच्या ठाकरे गटाला लक्ष्य केले.

केंद्रातील मोदी सरकारने दोन वेळेस मूल्यावर्धीत करात कपात केली होती. त्यामुळे इंधन १५ ते २० रुपयाने स्वस्त झाले होते. परंतु, राज्यातील ठाकरे सरकारने ही करकपात केली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!