CinemaWomen's WorldWorld update

कालिमातेच्या हाती सिगारेट!

– हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र विरोध
कोलकाता (ब्रेकिंग महाराष्ट्र) – निर्माते, दिग्दर्शक लीना मणिकेकलई यांनी बनविलेल्या काली या माहिती पटाच्या पोस्टरवरून सद्या जोरदार वादळ उठलेले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या पोस्टरवर काली मातेला सिगारेट ओढताना दर्शवले गेल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, निषेध नोंदवला आहे. सोशल मीडियावर तर टीकेचा राळ उठलेली दिसते. समलिंगी संघटनांचा झेंडा हातात घेतलेले काली मातेचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्या पोस्टरवर माता सिगारेट ओढत आहे, असे दर्शवले गेले आहे. या पोस्टर आणि एकूणच कथानकाबद्दल तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहा यांनीदेखील निषेध नोंदवला आहे. धार्मिक देवतांना कलेच्या नावाखाली बदनाम करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तुमची कला देवांची विटंबणा करून विकू नका, अशा शब्दांत त्यांनी निर्मात्यांना फटकारले.
दिग्दर्शक लीना मणिकेकलई यांनी काली माहिती पटाचे हे पोस्टर कॅनडातील आगा खान म्युझियम येथे प्रकाशित केले आहे. सद्या तेथे चित्रपट महोत्सव सुरु आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!