Pachhim MaharashtraSOLAPUR

वीस टक्के अनुदानाच्या पत्रासाठी शिक्षण विभागात शिक्षकांच्या चकरा!

सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागामध्ये सध्या ४० टक्के, ६० टक्के अनुदानाचे पत्र वाटप गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. परंतु २० टक्के अनुदानाचे पत्र वाटप अद्याप होत नसल्यामुळे झेडपीमध्ये माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक हेलपाटे मारत आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार असतानाच जवळपास ८० टक्के अनुदानाचे पत्र वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास २० टक्के कामकाजच राहिले आहे. त्यामध्ये तुकड्या अनुदानाचे पत्र व नव्याने ज्या शाळेला २० टक्के अनुदान मिळाले आहे, त्या शाळेला अनुदानाचे पत्र अद्याप वाटप करण्यात आलेले नाही. ज्या शाळेला २० टक्के नव्याने अनुदान मिळाले आहे, त्या शाळेबाबत अद्याप शासनाची भूमिका अस्पष्ट असल्याचे कारण माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग देत आहेत. याबाबत त्यांनी आयुक्तांचे मार्गदर्शक सूचना मागविले आहे. परंतु काही शाळांना पहिल्यांदाच २० टक्के अनुदानाचे पत्र वाटप केले असल्याची चर्चा सध्या आहे. त्यामुळे २० टक्केसाठी पात्र असलेल्या संस्थांमधून अस्वस्थ निर्माण होत आहे. अनेक शिक्षक जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागामध्ये २० टक्के अनुदानाचे पत्र कधी देणार, याबाबत चौकशी करीत आहेत.


ज्या शाळेला २० टक्के अनुदान शासनाने जाहीर केले आहे, त्या शाळेला अनुदानाचे पत्र देण्याबाबत अद्याप शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे मार्गदर्शक सूचना आल्यानंतर शाळांना अनुदानाचे पत्र देण्यात येईल. सध्या १८ शाळांना अनुदानाचे पत्र देण्यात आले आहे.
जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!