BULDHANAHead linesVidharbha

बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्यासह १० पोलिस अधीक्षकांना पदोन्नती

बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील दहा पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना राज्य सरकारने निवड श्रेणीतून पोलिस उपमहानिरीक्षकपदी (डीआयजी) पदोन्नती देण्याचा आदेश आज जारी केला आहे. यामध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये बुलढाणा येथे पोलिस अधीक्षक म्हणून आलेले सारंग आवाड यांनाही ‘डीआयजी’पदी पदोन्नती मिळाली असून, त्यांची पदोन्नतीने पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे. बुलढाण्याचे पूर्वीचे पोलिस अधीक्षक ए. एच. चावरिया यांनाही पदोन्नती मिळाली असून, त्यांचीही पुण्यातच अपर पोलिस आयुक्त म्हणून पदस्थापना झाली आहे. शेतकरी आंदोलकांवर लाठीमार प्रकरणी सारंग आवाड हे बुलढाण्यात वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली होती. शहरी पोलिसींगचा प्रदीर्घ अनुभव असलेले आवाड हे बुलढाणासारख्या ग्रामीण पोलिसींगसाठी आले होते. त्यामुळे त्यांना बुलढाणा जिल्हा हाताळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. खास करून राजकीय विरोधकांचा त्यांच्यावर रोष होता.

राज्य सरकारने आज, २४ एप्रिलरोजी राज्यातील दहा पोलिस अधीक्षकांना निवड श्रेणीने पोलीस महानिरीक्षक श्रेणीत बढती दिली आहे. यामध्ये बुलढाणाचे जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड़ यांना पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक पदी पदस्थापना देण्यात आली. ऑक्टोबरमध्ये सारंग आवाड हे बुलढाण्यात पोलिस अधीक्षक म्हणून आले होते. याशिवाय, बृहन्मुबई पोलीस उप आयुक्त अभिनव ़देशमुख यांची अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग बृहन्मुबई, अनिल पारस्कर पोलीस उपआयुक्त बृहन्मुबई यांची अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग बृहन्मुबई, एम.रामकुमार पोलीस उपआयुक्त बृहन्मुबई यांची अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक मुंबई, शशिकुमार मीणा समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. आठ मुंबई यांची अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे मुंबई, प्रवीण पाटील समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. एक पुणे यांची अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, संजय पाटील पोलीस उपआयुक्त बृहन्मुबई यांची अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर, वसंत के.परदेशी समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. सात, दौड़ जि.पुणे यांची अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड़ शहर, पी.पी.शेवाळे कार्यकारी संचालक सु. व अ.म.रा.विद्युत वितरण कं.मर्या.मुंबई यांची अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग नागपूर शहर व ए. एच. चावरिया पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांची अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहरपदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

येथे वाचा पदोन्नती यादी


दोन ‘आयपीएस’ अधिकार्‍यांची बदली

राज्य शासनाने आज भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) दोन अधिकार्‍यांची बदली केली आहे. यामध्ये पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले विरेंद्र मिश्रा यांची अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुबई व दीपक साकोरे पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे यांची अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.


अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्याच्या गृह विभागाकडून अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काहींना पदोन्नती देण्यात आली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यावर हप्तेखोरीचा आरोप केला होता. गुप्ता यांचीदेखील बदली झाली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे सहआयुक्त मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निखील गुप्ता यांच्या बदलीचे विशेष आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची बदली, विशेष पोलिस महानिरीक्षक, अस्थापना, पोलिस महासंचालक कार्यालयात झाली आहे.

या बदल्यांचा तपशील खालील प्रमाणे :

  • संजय दराडे – विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
  • अनिल कुंभारे – विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक
  • दिलीप सावंत – विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा
  • ज्ञानेश्वर चव्हाण – विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिषद
  • एस एन पुरे – विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्ह्यांविषयी विभाग पुणे
  • डॉ. मनोज लोहिया – छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्त
  • डॉ.पंजाबराव उगले – अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे विभाग
  • डॉ.अभिनव देशमुख – दक्षिण मुंबई अप्पर पोलीस आयुक्त
  • अनिल पारस्कर – अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग
  • एम रामकुमार – अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक विभाग
  • शशी कुमार मीना – अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मुंबई
  • प्रवीण पाटील – अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!