बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – पुलवामामध्ये भारतीय जवानांचे झालेले हत्याकांड व जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल तथा भाजपनेते सत्यपाल मलिक यांनी केलेल्या ३०० कोटींच्या गंभीर आरोपांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीच बोलायला तयार नाहीत. याविरोधात मलकापूर व लोणार शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने आज, १७ एप्रिलरोजी ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
भाजपचे वरिष्ठ नेते तथा जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहेत. पुलवामा घटनेमध्ये ४० जवानांचे बळी गेले व त्यात सरकारची चूक आहे, हे निदर्शनास आणून दिले असता, आपणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प राहण्यासाठी सांगितले, असा थेट आरोप भाजपचेच नेते असलेल्या मलिक यांनी केला आहे. यासह इतरही प्रश्नांची उत्तरे मात्र अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे.
मलकापूर शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने आज, १७ एप्रिल रोजी तहसील चौकात याविरोधात ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन करण्यात आले. यामध्ये हाजी रशीदखॉ जमादार, सोपानभाऊ शेलकर, सौ. मंगलाताई पाटील, प्रमोददादा अवसरमोल, अॅड़. जावेद कुरेशी, बंड़ूभाऊ चौधरी, राजूभाऊ पाटील, शरद मोरे, ज्ञानदेव कोलते, अनिल गांधी, तुषार पाटील, सुहास चवरे, प्रविण क्षीरसागर, सौ.पंचफुला पाटील, सौ.प्रिती भगत, सौ. कल्पना पाटील, ज्ञानदेव तायड़े, विनय काळे, दिलीप गोळीवाले, सनाऊल्ला जमादार, हरीभाऊ देशमुख, युनुस खान, अनिल भारंबे, किसनराव पाटील, सिद्दांत इंगळे, गजानन वाघ, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लोणार तालुका अध्यक्ष राजेश मापारी व शहराध्यक्ष शे.समद शे.अहमद यांच्या नेतृत्वाखाली लोणार तहसीलदार कार्यालयासमोर शर्म करो मोदी, शर्म करो आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते साहेबराव पाटोळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, उपनगराध्यक्ष बादशहा खान, गटनेते भूषण मापारी, तोफीक कुरेशी, नगरसेवक संतोष मापारी, नगरसेवक शे.रऊफ, प्रा.सुदन कंकाळ, शे. करामत शे.गुलाब, काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष भारत राठोड, पंढरी चाटे, रामचंद्र कोचर, शे.अस्लम भाई, मोहसीन शहा, मनीष पाटोळे, अफसरभाई, श्रीकृष्ण बाजड़ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.