बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतमालाचे पैसे थकविणार्या गाडेबंधुंवर गुन्हा दाखल करून अटक करा, ही मागणी घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्यायग्रस्त शेतकर्यांना घेऊन काल थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली.
याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड़ यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की चिखली तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी आपला शेतमाल चिखलीतील व्यापारी संतोष गाड़े व त्यांचे बंधू यांना विकला, पण मालाचे पैसे दिले नाहीत. तरी शेतकर्यांची फसवणूक करणारे गाड़ेबंधू यांच्यावर कारवाई करावी, व त्यांची संपत्ती जप्त करून शेतमालाचे पैसे द्यावे, असेही त्यानी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी तुपकरांनी गाडेबंधुंवर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशीही मागणी अन्यायग्रस्त शेतकर्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड़ यांच्याकडे केली. शेतमाल खरेदी करून पैसे न देता, गाडेबंधु कोट्यवधी रूपयांची फसवणूक करून सद्या फरार आहेत.