बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतकरी उध्वस्त होत असून, शासन मात्र शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही, असा थेट आरोप विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. शासन मदतीच्या निकषाचे केवळ कागदी घोड़े नाचवत आहे, असेही ते म्हणाले.
खामगाव तालुक्यातील चितोड़ा येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची ना. दानवे यांनी काल बांधावर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकर्यांना नुकसानीची मदत देण्यासाठी शासनाला भाग पाडू, असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी चितोड़ा येथील वीज पड़ून मृत्यू पावलेल्या गोपाल महादेव कवळे या शेतकर्याच्या कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी शिवसेनेचे (ठाकरे) संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेड़ेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक गजानन धांड़े, तालुका प्रमुख रवि महाले, शहर प्रमुख विजय बोदड़े, विजय इंगळे, सुरज बेलोकार, प्रविण वाघ, ड़ॉ. घ्यार, ज्योती तारापुरे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
————–