Political NewsPoliticsWorld update

एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस चारीमुंड्या चीत!

खरं नाही ना वाटत? तुम्ही म्हणाल काय हा विक्रांत पाटील काहीही फेकतो. पण हे १०० टक्के सत्य आहे आणि हे सत्य आहे सायबर विश्वाचे, व्हर्च्युअल दुनियेतील! १५ ते ३५ ची पिढी ज्या दुनियेत सर्वाधिक रमते, त्या इंटरनेट जगतात, राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोज भाजपाने डिमोट केलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड देऊन चारीमुंड्या चीत करीत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांचा तुलनात्मक सर्च अभ्यास केला असता दिसून येते, की इंटरनेट दुनियेतील लोकांना शिंदे यांच्याबद्दल जाणून घेण्यातच सर्वाधिक उत्सुकता आहे. फडणवीस यांच्या ४ टक्केच्या तुलनेत जगभरात ९६ टक्के लोक हे शिंदे यांना शोधत आहेत. भारतात हे प्रमाण सरासरी शिंदे ७६ तर फडणवीस २४ टक्के इतके आहे.
ज्या दिवशी भाजपा दिल्ली हायकमांडच्या आदेशानुसार, एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली, त्यानंतर इंटरनेटवर शिंदे यांच्याविषयी शोधाशोधी अचानक झूम झूम झ्याक वाढली होती! ज्या आसामात पळून गेलेले फुटीर आश्रयास आणि निगराणीखाली बंदोबस्तात होते, त्या आसामातील सर्वच्या सर्व म्हणजे १०० टक्के नेटकरी हे, कोण हा एकनाथ शिंदे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना फडणवीस यांच्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. गोवा, चंदीगड, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्येही सर्व सर्चेस/क्वेरीज या शिंदे यांच्यासाठी आहेत. गुजरातेत हे प्रमाण ७५-२५ तर महाराष्ट्रात ८३-१७ इतके आहे. अमेरिकेतून शिंदे यांच्यासाठी ६९ टक्के तर फडणवीस यांच्यासाठी ३१ टक्के सर्चेस येत आहेत.

काय शोधताहेत नेटकरी?
१. एकनाथ शिंदे
२. मुख्यमंत्री शिंदे
३. एकनाथ शिंदे जात
४. एकनाथ शिंदे मूळ गाव
५. आनंद दिघे
६. एकनाथ शिंदे माहिती
७. एकनाथ शिंदे कितवे मुख्यमंत्री
8. New CM of Maharashtra
९. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण
१०. मीनाक्षी शिंदे
११. एकनाथ शिंदे किस पार्टी के है
12. Eknath Shinde Caste Name
१३. एकनाथ शिंदे जाति
१४. शिंदे सरकार

नेटकरी जोडीला उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्र राज्यपाल, अमृता फडणवीस, आदित्य ठाकरे, Maharashtra Politics याचाही या अनुषंगाने शोध घेत आहेत.

एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येतेय का? इतर कुठल्याही चॅनेल्सवरील रटाळ लाईव्हपेक्षा सध्याची SAAM TV चर्चा ही सर्वात उजवी, चांगली वाटतेय. ती अधिक सद्यस्थितीशी सुसंगत वाटतेय. गेले काही दिवस साम टीव्ही चॅनेल सातत्याने वेगळेपण जपून ठेवताना दिसतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!