Pachhim MaharashtraSOLAPUR

सोलापुरात बाबासाहेबांच्याचरणी भीमसैनिक नतमस्तक!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादनासाठी जनसागर लोटला ‘जय-भीम’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. गेल्या दोन-तीन वर्षात कोरोनाचे सावट असल्यामुळे भीम सैनिकांच्या उत्सवामध्ये विरजण पडले होते. परंतु यंदा सर्व बंधने मुक्त झाल्यामुळे यंदाच्या भीम जयंतीनिमित्त अभिवादनासाठी भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बाबासाहेबांना अभिवादनासाठी रात्री बारापासूनच पुतळ्यासमोर भीमसैनिक येत होते. त्यानंतर पुढे सकाळी नऊ वाजेपासून राजकीय, सामाजिक, शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. पुतळा परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे परिसर उठावून दिसत होता. विशेष म्हणजे, अभिवादासाठी आलेल्या भीमसैनिकांनी महापुरुषांची पुस्तके खरेदीसाठी गर्दी केली होती. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली होती. लहान मुलापासून ते महिला वर्गांनी अभिवादन करून सेल्फ घेण्यासाठी गर्दी केली होती.

बाबासाहेबांना अभिवादनासाठी सकाळपासूनच राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मंडळी गर्दी केली होती यंदा सकाळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त अजित बोर्‍हाडे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, जात पडताळणी समितीच्या सहाय्यक आयुक्त छाया गाडेकर, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थिती त सामूहिक बुद्ध वंदना घेऊन पुष्कर अर्पण करण्यात आले शशी कांबळे, उत्सव अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आले. याबरोबरच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक विनोद भोसले, भाजपचे आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री दिलीप कांबळे, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी , आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री लक्षमणराव ढोबळे, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी महापौर श्रीकांचना यंन्नम, श्रीनिवास करली, सुभाष शेजवाळ, वंदना गायकवाड, इंदिरा कुडक्याल, राजाभाऊ माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.


रविवारी २३ एप्रिल रोजी मिरवणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतभर जरी साजरी होत असली तरी प्रत्यक्षात सोलापूरमधील मिरवणूक २३ एप्रिल रोजी रविवारी होणार आहे. या मिरवणूकमध्ये जवळपास ४०० हून अधिक मंडळी सहभागी होणार आहेत.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!