BULDHANAHead linesVidharbha

आईवरून शिवी दिली; तरूणाचा गळा दाबून खून!

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – आईवरून शिवीगाळ करण्याच्या कारणावरून येथील दोन युवकात वाद होऊन, राग अनावर झाल्याने शिवीगाळ करणार्‍याचा नाक व गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना येथील वार्ड क्र.६ मध्ये काल रात्रीच्या सुमारास घडली.

सविस्तर असे, की प्रशांत योगेंद्र गवई, रा.सावंगी भगत असे आरोपीचे नाव असून, शेख आदील शेख अकील, वय १७, रा.साखरखेर्डा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सदर घटना येथील वार्ड क्र. ६ मध्ये काल ता. १३ चे रात्री २१.३० ते रात्री २२.०० चे दरम्यान घडली आहे. मृतकाचा भाऊ फिर्यादी शे.सोहील शे.अकिल, वय २१, वार्ड क्र.१, साखरखेर्डा याने ता.१४ चे सकाळी ३.१२ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतकाचा भाऊ शेख सोहील शेख अकील, वय २१ वर्ष, व्यवसाय-मिस्त्री काम, वार्ड नं.१, रा. साखरखेर्डा यांनी येथील पोलीस स्टेशनला हजर येऊन तोंंडी रिपोर्ट दिला की, माझा भाऊ शेख आदील शेख अकील हा प्रशांत योगेंद्र गवई, रा. सावंगी भगत, गोकुळ प्रताप कामे व हन्नानशहा मन्नानशहा हे दोघे रा. साखरखेर्डा हे सर्व गोकुळ प्रताप कामे याचे घरी वार्ड नं. ६ मध्ये बसलेले असतांंना शेख आदील शेख अकील व प्रशांत योगेद्र गवई रा. सावंगी भगत याचे सोबत ता.१३/०४/२३ चे रात्री ९.३० वा ते १०.०० वाजे दरम्यान वाद झाला. माझा भाऊ शेख आदील शेख अकील याने प्रशांत योगेद्र गवई यास आईवरुन शिवी दिल्याने त्याचा राग अनावर होऊन प्रशांत योगेंद्र गवई याने भांडणात माझा भाऊ शेख आदील शेख अकील याची गळचिपी व नाक दाबल्याने तो जागेवर बेशुध्द पडला. त्यास प्रथम साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून ग्रामीण रुग्नालय चिखली येथे उपचारासाठी रेफर केले असता तेथे मरण पावला. उपरोक्त फिर्यादीवरून आरोपीविरूध्द खुनासह इतर कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!