ChikhaliVidharbha

बाजार समिती निवडणुकांत इतरांशी हातमिळवणी कराल तर खबरदार; कारवाईच!

– प्रदेशाध्यक्षांचा आदेश पाळा, काँग्रेसच्या तालुका व शहराध्यक्षांना राहुल बोंद्रे यांच्या सूचना

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात सद्या होत असलेल्या बाजार समिती निवड़णुकीत महाविकास आघाड़ी व्यतिरिक्त इतरांसोबत आघाडी-युती करू नका, तसे आढळल्यास कारवाईचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. सदर आदेश पाळा अशा सूचना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी जिल्ह्यातील तालुका व शहराध्यक्षांना १२ एप्रिलरोजी दिल्या आहेत.

याबाबत राहुल बोंद्रे यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद आहे, की राज्यात सध्या बाजार समिती निवड़णुका सुरू आहेत. सदर निवड़णूक महाविकास आघाड़ीतील घटक पक्षांना सोबत घेऊन लढवावी. काँग्रेस पक्षातून जर कोणी स्थानिक पातळीवर महाविकास आघाड़ीतील घटक पक्षाव्यतिरिक्त इतर पक्षासोबत हातमिळवणी केल्यास कारवाई करण्याचे निर्देश प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी ११ एप्रिलरोजीच्या पत्रान्वये जिल्हा काँग्रेस कमिटीला दिले आहेत. तरी सदर निवड़णकीत महाविकास आघाडी व्यतिरिक्त इतर पक्षासोबत सोबत युती होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केलेले आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!