Head linesVidharbhaWARDHA

क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळणार्‍या मुख्य बुकीसह सहा जणांना ठोकल्या बेड्या

– आरोपींकडून ४९ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

वर्धा (प्रकाश कथले) – दिल्ली येथील अरुण जेटली क्रिकेट स्टेडिअमवर सुरू असलेल्या आयपीएल टी २०/२० क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळणार्‍या मुख्य बुकींसह सहा जणांना पोलिस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकासह सायबर सेलने कारवाई करीत बेड्या ठोकल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्यात वर्ध्याच्या भामटीपुर्‍यात राहणारा गणेश राठी, सलमान रज्जाक मेमन (वय २७) रा.शास्त्री चौक,रामनगरातील सिंदी नाका चौकात राहणारा जितेंद्र रणजित तिवारी (वय ३४), दयालनगरात राहणारा माधव इश्वरदास नानवानी (वय ३४), रामनगरातील परदेशीपुर्‍यात राहणार्‍या मुकेश अनिल मिश्रा (वय ३३), गजानननगरातील वैद्य ले आऊटमध्ये राहणारा रिंकेश मनोज तिवारी (वय २७) यांचा समावेश आहे.

पोलिस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाला भामटीपुर्‍यात राहणारा गणेश राठी हा तेलंगपुरा आखाड्यासमोर मोठ्या वडाच्या झाडाखाली ओट्यावर बसून अ‍ॅण्ड्राईड मोबाईलवर दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर सुरु असलेल्या क्रिकेट मॅचवर प्रत्येक बॉलच्या रनवर तसेच विकेटवर हार जीतचा सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्या मोबाईलच्या संदेश बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक ७३८७१८८३९७ या क्रमांकावरून दिल्ली विरुद्ध मुंबईच्या सामन्यात १० ओव्हरमध्ये ७० धावा काढल्या जातील, असा दोन हजार रुपयांचा जुगार लावल्याचे दिसले. हा मोबाईल आरोपी सलमान रज्जाक मेमन (वय २७) रा.पोद्दार बगिचा वर्धा, याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सायबर सेलने तांत्रिक माहिती काढली असता सलमान रज्जाक मेमन हा बुटीबोरी टाकळघाट येथे असल्याचे दिसून आले. पोलिस कर्मचारी तेथे पंचासह रवाना झाले त्यावेळी टाकळघाट येथे पोहोचले असता तेथील लिंक बिल्डिंगमध्ये फ्लॅट क्रमांक १० मध्ये क्रिेकेट सामन्यावर जुगार सुरू असल्याचे दिसले. तेथून पोलिसांनी सलमान रज्जाक मेमन (वय २७) रा.शास्त्री चौक,रामनगरातील सिंदी नाका चौकात राहणारा जितेंद्र रणजित तिवारी (वय ३४),दयालनगरात राहणारा माधव इश्वरदास नानवानी (वय ३४),रामनगरातील परदेशीपुर्‍यात राहणार्‍या मुकेश अनिल मिश्रा (वय ३३),गजानननगरातील वैद्य ले आऊटमध्ये राहणारा रिंकेश मनोज तिवारी (वय २७), यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून मोबाईल, लॅपटॉप, एमएच ३२ एएस ५७८६ क्रमांकाची कार, असा ४९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हा जुगार खेळण्याकरीताचे सहकारी वर्धा,चंद्रपूर,नागपूर,यवतमाळ तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातीलही असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.सागर कवडे,यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे,सहायक पोलिस निरीक्षक विनित घागे,यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पोलिस अंमलदार नीलेश कट्टोजवार,रोशन निंबाळकर,दिनेश बोथकर,विशाल मडावी,अनुप कावळे,अक्षय राऊत,सागर भोसले,अंकित जिभे,मिथुन जिचकार,अरविंद इंगोले,मंगेश आदे,गोविंद मुंडे,धीरज राठोड,राकेश इतवारे,पवन देशमुख,अभिषेक नाईक,हर्शल सोनटक्के,प्रफुल्ल वानखेडे यांनी केली.


क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळणार्‍यांवर जिल्ह्यात झालेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांना घाम फोडला तर सज्जनांना दिलासा दिला आहे. गुन्हेगारांची जिल्ह्यातूनच पळापळ सुरू झाली आहे.त्यामुळे या सट्टाबाजांनी जिल्ह्याच्या बाहेर टाकळघाट येथे अड्डा जमविला होता. पण येथेही पोलिस अधीक्षकांचे पथक पोहोचले तसेच गुन्हेगारांना पळता भुई थोडी केली.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!