Pachhim MaharashtraSOLAPUR

आरोग्य विभागाच्या चार कर्मचार्‍यांना निलंबनाच्या नोटिसा!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावा, शासनाच्या आदेशाप्रमाणे फाईलीचा निफ्टरा त्वरित करा अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. शिवाय चार कर्मचार्‍यांना निलंबनाच्या नोटीसा दिल्याने इतर कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आरोग्य विभागाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीमध्ये स्वामी यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या. त्याप्रसंगी त्यांनी मेडिकल बिलाच्या बर्‍याच फाईली प्रलंबित आहेत. त्या फायलीसाठी सध्या निधी नाही. त्यामुळे मेडिकल बिले मंजूर होण्यास विलंब लागत आहे. तरी निधी आला की त्या सर्व मेडिकल बिले मंजूर केले जातील. असे आश्वासन सीईओ स्वामी यांनी दिले. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी समन्वय ठेवून काम करावे. जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागाच्या तक्रारी येऊ नये यासाठी काम करावे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बगाडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!