आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील कल्याण महाराज कल्याणकर आळंदीकर, माऊली सेवा ग्रुप आळंदी यांच्या वतीने विनामूल्य संस्कार शिबिराचे आयोजन १ ते १४ मे २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. या शिबिरात शालेय मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन कल्याण महाराज कल्याणकर यांनी केले आहे.
देशात आदर्श बालके व समाज निर्माण करण्यासाठी मुलांना संस्कारक्षम बनविण्याची गरज आहे. या शिबिरातून हि संधी मिळत असल्याने शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात सकाळी ६ ते ८ योग, प्राणायम, ध्यान, सुर्यनमस्कार, शारीरिक व बौध्दिक व्यायाम, स्मरण शक्ती वाढविण्यासाठी योगासने शिकविली जाणार आहेत. न्याहारी त्यानंतर सकाळी ९ ते ११ संस्कृत श्लोक, मंत्र, संत साहित्य वाचन, आदर्श जीवनाचे विचार प्रबोधन, नामजप होईल. ११ ला मृदंग, तबला यांचे वर्ग, शुध्द सात्त्विक भोजन प्रसाद होईल.
तीन वाजता हार्मोनियम, भजन, अभंग गायनाचे वर्ग, ४ वाजता शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण, शारीरिक कवायत, खेळ होतील. ६ वाजता हरिपाठ, पाऊली खेळणे शिक्षण वर्ग, सायंकाळी सात वाजता संतचरित्र, महापुरूषांचे चरित्र इत्यादी विषयावर व्याख्याने होणार आहेत. रात्री साडे आठ वाजता शुध्द सात्त्विक भोजन प्रसाद असे दैनंदिन नियोजन राहणार असल्याचे कल्याणकर महाराज यांनी सांगितले. मोफत शिबीर असल्याने नियोजनासाठी शिबीर पूर्व नांव नोदणी २५ एप्रिल पर्यंत संपर्क क्रमांक ७३५०७६९८५७ यावर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply