बुलढाणा/अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र अवगया कोथळी बु.येथे हनुमान जयंतीला वानरसेनेला गोड़धोड़ची मेजवानी देण्यात आली. या आगळ्यावेगळ्या मेजवानीची चर्चा चवीने रंगत असून, कौतुकही होत आहे.
वीर हनुमान तसे रामाचे परमभक्त त्यामुळे सहाजीकच वीर हनुमानामध्येसुध्दा प्रभू श्रीराम यांना पाहिले जाते. दरवर्षीच हनुमान जयंतीला सहसा गोवर्यात भाजलेल्या रोड़ग्यांचे चवदार जेवण सर्वच ठिकाणी दिले जाते. लोकही प्रसाद म्हणून असे जेवण टाळतच नाहीत. पण अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र अवगया कोथळी बु. संस्थानच्यावतीने मात्र हनुमान जयंतीनिमित्ताने काल, ६ एप्रिलरोजी वानरांना गोड़धोड़ची मेजवानी देण्यात आली. वानरांनीसुध्दा माणसाला लाजवेल असे एका लाईनमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेतला. या आगळयावेगळया पंगतीची चर्चा चवीने होत असून, लोक सदर संस्थांनचे कौतुकदेखील करत आहेत.