चिखली (तालुका प्रतिनिधी) – मंथन पब्लिकेशनद्वारे आयोजित शासनमान्य मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये मिसाळवाडी येथील उपसरपंच हनुमान मधुकर मिसाळ यांची कन्या कुमारी जानवी हनुमान मिसाळ हिने तालुक्यातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलेला आहे. जानवी ही जिल्हा परिषद आदर्श शाळा, वरखेड या ठिकाणी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाने मिसाळवाडी गावाचे नाव तिने उंचावले आहे.
जिल्हा परिषद आदर्श शाळा, वरखेड ही संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये एक नवोपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच, पश्चिम विदर्भातील प्रथम आयएसओ मानांकित शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक आहे. याच शाळेची जानवी विद्यार्थिनी असून, तिने तिच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे सुयश मिळवलेले आहे. कुठल्याही प्रकारची वैयक्तिक ट्युशन नसताना केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे सुयश मिळवले. जानवीच्या या यशाबद्दल मिसाळवाडी गावाचे सरपंच बाळू पाटील, आदर्श मुख्याध्यापक प्रवीण मिसाळ, ज्येष्ठ संपादक व उद्योजक पुरूषोत्तम सांगळे, उद्योजक बळीराम मिसाळ, यांच्यासह सर्व मिसाळवाडी ग्रामस्थ, तसेच जिल्हा परिषद आदर्श शाळा वरखेड यांच्यावतीने तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच वरखेड गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत समिती सदस्य व गावकरी मंडळी यांनी जानवीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून जानवीचे कौतुक होत आहे.