BULDHANAVidharbha

महावितरणच्या अकोला परिमंडळात मुख्य अभियंतापदी दत्तात्रय पडळकर रूजू

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या रिक्त असलेल्या मुख्य अभियंतापदाचा पदभार दत्तात्रय विष्णू पडळकर यांनी स्वीकारला. महावितरण कंपनीमध्ये गेली वीस वर्षे सेवा देणारे पडळकर सांघिक कार्यलय येथे मुख्य तपास अधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी नांदेड परिमंडळ येथे मुख्य अभियंतापदी चार वर्ष यशश्वी कारकीर्द पूुर्ण केलेली आहे. कनिष्ठ अभियंता ते मुख्य अभियंता असा प्रवास करत त्यांनी महावितरण कंपनीच्या समृद्धीसाठी अविरत काम केलेले आहे. खानदेशासह त्यांची सर्वाधिक सेवा ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली आहे. दरम्यान, वीज ग्राहकाने दिलेल्या तारीखेच्या आत वीजबिल भरण्यासंदर्भात महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे. महावितरणने वीजबिल वसूलीमोहीम अधिक तीव्र केली असून, बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी दिनांक ३० मार्च तसेच येणारा शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आली आहेत.

अभ्यासू व परिणामकारक प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेले श्री. पडळकर कंपनीचे हित सर्वश्रेष्ठ मानत कर्मचार्‍यांशी सलोख्याने काम करणारे तसेच कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुख्य अभियंता पदाचा पदभार सांभाळताना तत्काळ विभाग निहाय बैठका घेऊन माहीती जाणून घेतली.अकोला मंडळातील रोहित्र दुरुस्तीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत, अखंडित वीज पुरवठ्यासाठी ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर भर देऊ, तसेच थकबाकी वसुलीसाठी सातत्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वीज ग्राहकांनीही कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन वेळच्या वेळी बिल भरून सहकार्य करावे. त्याचबरोबर अधिकृतपणे वीज वापर करावा, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.


वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा होणार खंडित

वीजबिलासाठी ग्राहकांचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा संपूर्ण चालू तसेच थकीत बिल आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय जोडण्यात येणार नाही. सार्वजनिक सुट्टीतही महावितरण कार्यालये सुरू आहे, वसुलीसाठी ग्राहकांच्या दारापर्यंत महावितरणचे कर्मचारी येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वादविवाद टाळावे व वीजबिल भरून सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत वीज बिल भरणा केंद्राशिवाय महावितरण मोबाईल ॲपवर वीज बिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. तसेच www.mahadiscom.in या संकेत स्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीज बिल भरता येते. तसेच वीज बिलावर दिलेला क्यु आर कोड स्कॅन करून थेट पेमेंट गेटवे वर जाऊन वीज बिल भरणे सुलभ झाले आहे. महावितरणच्या अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू तसेच थकीत वीज बिलाचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!