सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शासनाने खाजगी शाळांना अनुदानाचा टप्पा वाढविला आहे. या अनुदानाचा टप्पा आपल्या शाळेला मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केलेल्या शिक्षकाची सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात गर्दी केली होती. परंतु माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार केवळ चार कर्मचाऱ्यांवर सोपविल्याने आश्रय व्यक्त केले जात आहे.
गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून खाजगी संस्थांमध्ये शिक्षक कमी पगारावर शिक्षकांना काम करावे लागत होते. शासनाने आता कुठे अनुदानाचा टप्पा वाढविला आहे. परंतु जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी जाग्यावरच नव्हते. अनुदानाचा टप्पा वाढविलेल्या संस्थेचे मुख्याध्यापक, शिक्षक झेडपी मध्ये तळ ठोकून बसले असल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. अधीक्षक सुनिल शिखरे पंधरा दिवस रजेवर गेले आहेत तर कनिष्ठ सहायक संजय बानूर हे कॅम्प मध्ये आहेत. तर बंडू मोरे यांचा मोबाईल बंद लागत आहे. शिक्षणाधिकारी हे देखील जाग्यावर नाहीत. त्यामुळे शिक्षकांना हेलपाटे मारण्यापलीकडे काहीच करता येत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता. शासनाने खाजगी संस्था अनुदान वाढीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक शिक्षक सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून झेडपी मध्ये आले होते परंतु शिक्षण अधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी नसल्याने या शिक्षकांना दिवसभर झेडपीच्या आवारात ताटकळत थांबावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, माध्यमिक विभागाचा कारभार सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा काही संघटनांनी नाव घेण्याच्या अटीवर माध्यमाना सांगितले.
आर्थिक देवाण-घेवांणचीही चर्चा!
शासनाने 20 टक्के, 40 टक्के, टक्के 60 अनुदानाची यादी जाहीर केली आहे. परंतु या अनुदानाची यादी जाहीर झालेल्या शाळा कडून झेडपीचे कर्मचारी आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय पत्र देत नसल्याची चर्चा सध्या शिक्षक वर्गामध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.