Head linesKARAJAT

खर्डा ते कर्जत निघाली ‘शिवराय ते भीमराय समता रॅली’

कर्जत (प्रतिनिधी) – रयतेच्या आणि समतेच्या राज्यासाठी दि. २० मार्च रोजी शिवराय ते भीमराय समता रॅलीचे आयोजन करण्यात आले. खर्डा ते कर्जतदरम्यान निघालेल्या मोटारसायकल रॅलीचा समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला. ग्रामीण विकास केंद्र, संविधान प्रचारक, माय लेकरू प्रकल्प जामखेड यांचे वतीने आयोजित करण्यात आले होते.

२० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार पाण्याला पिऊन आंदोलन केले होते, त्याच ऐतिहासिक दिनानिमित्त शिवराय ते भीमराय समता रॅलीचे आयोजन करण्यात आले. १५ गावातून जनजागृती करत आलेल्या या रॅलीचे समारोप प्रसंगी ग्रामीण विकास केंद्राचे बापूसाहेब ओहोळ यांनी प्रास्ताविक करताना विशाल पवार यांच्या संकल्पनेतून निघालेल्या या रॅलीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रा. विक्रम कांबळे यांनी बोलताना उच्चवर्णीय ज्यावेळी सत्तेवर जातात त्यावेळी ते अन्याय अत्याचार करतात, डॉ बाबासाहेबाच्या अनेक कामांना पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार्‍या अनेकांनी मदत केलेला इतिहास सांगितला, आज बाबासाहेबांबरोबर गद्दारी करणारे निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक लोक अधिकार आंदोलनाचे अ‍ॅड. अरुण जाधव यांनी बोलताना या रॅलीत विविध समाजाचे लोक सहभागी झाले आहेत, ७५ मोटासायकलस्वार तिरंगा झेंडा लाऊन १५ गावात जनजागृती करत शिवराय ते भिमराययांचे नाते विषद केले.

छत्रपती शिवाजी महाराज या एकमेव राज्याने सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करत हिंदवी स्वराज्य निर्माण केले तर तेच कार्य पुढे नेत संविधानात सर्वांना न्याय देण्याचे काम केले. या दोघांनीही प्रस्थापित व्यवस्थेला विरोध केला, ऐकाने तलवारीच्या जोरावर राज्य केले तर दुसर्‍याने लेखणीच्या जोरावर सर्वाचे राज्य आणले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा समतेचा न्यायाचा होता, आपण सर्व लढणारे कार्यकर्ते आहोत, तुम्हाला भविष्यात लढायचे आहे. या दोन महापुरुषांना बरोबर घेऊन आपण निघालात तर आपल्याला कोणतीही महाशक्ती अडवू शकणार नाही, सध्याची व्यवस्था संविधान बदलण्यासाठी काम करत आहे त्याला आगामी काळात विरोध करावा लागणार आहे. आम्ही विचाराचे मावळे आहोत, संख्येने कमी असू पण डावपेचांने तुम्हाला सळो की पळो करून सोडू असे सांगत आज कार्यकर्त्यानी खूप कष्ट घेतले असून आपण समाधानी असल्याचे म्हटले व सर्वाचे आभार मानले. या रॅलीची चर्चा सर्वत्र झाली हे आपले यश आहे. एका आदिवासी मुलाने मांडलेली कल्पना यशस्वी होताना आनंद होत असल्याचे म्हटले. यावेळी सोमनाथ भैलुमे, तुकाराम पवार, गोदड समुद्र, सोमनाथ गोरे, नंदकुमार गाडे, उमा जाधव, फरिदा शेख, शुभांगी गोहेर, दिसेना पवार, रंगिषा काळे, शीतल काळे, नवनाथ साळवे, नंदकुमार कांबळे आदी सह अनेक जण उपस्थित होते. शेवटी लखन बारसे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!