म्हणे हा तर सुनेला आमदार करण्याचा खासदार जाधवांचा डाव !
मेहकर(सिद्धेश्वर पवार) :- खा प्रतापराव जाधव….कुठलाही राजकीय वारसा नसतांना संघर्षातून उदयाला आलेलं विदर्भाच शिवसेनेचं एक मोठं नेतृत्व.
संघर्ष करत असतांना सडेतोड वागणं हे खा जाधवांच्या रक्तातच
लांगूनचालनाला थारा न देता ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा स्वीकारत प्रसंगी पक्ष नेतृत्वाविरुद्ध देखील अनेकदा बंड केले ते खासदार जाधवांनीच !
मात्र याच खासदार जाधवांविषयी सतत भ्रम पसरविण्याचे काम अफवा पेरण्यात पटाईत असलेल्या मेहकर मतदारसंघात सातत्याने केले जात असते.
मग नारायण राणे यांचे विश्वासू आणि त्यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे खात्याचे मंत्रिपद भूषविणारे प्रताप जाधव राणे यांनी शिवसेना सोडताच त्यांच्या पाठोपाठ प्रतापराव जाधव देखील शिवसेना सोडणार या अफवांचे पीक त्यावेळी देखील जोमात आले होते,मात्र त्यानंतर देखील शिवसेनेत कायम दिसले ते खा जाधवं!
मराठा मोर्चा वेळी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात मराठा मोर्चाला मुका मोर्चा असे एका व्यंगचित्रातून संबोधित केल्याने मराठा समाजात असंतोषाची तीव्र लाट पसरली होती. समाजाच्या भावना लक्षात घेता, शिवसेनेत अनेक मराठा नेते असतांना देखील तत्कालीन आमदार डॉ शशिकांत खेडेकर ,मेहकर चे आमदार संजय रायमूलकर यांचेसह मातोश्री च्या तोंडावर राजीनामा फेकून आपली नाराजी उघडपणे व्यक्त करण्याची ताकद दाखवून दिली होती ती केवळ खा जाधव यांनीच. आ संजय रायमूलकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणारच असे अपेक्षित असतांना ऐनवेळी रायमूलकर यांचे मंत्रिपद नाकारल्याने खा जाधव यांनी खा भावना गवळी, आ संजय रायमूलकर, आ संजय गायकवाड, आ नितीन देशमुख, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळूकर यांच्यासमवेत एका हॉटेल मध्येच थांबून मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. मातोश्री च्या न पटलेल्या अनेक निर्णयाच्या बाबतीत खा जाधव यांनी विरोध करण्याचे धारिष्ट्य प्रत्येकवेळी दाखविले तर आता सुरू असलेल्या राजकीय नाट्याबाबत देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपा सोबत युती करावी असे आपले स्पष्ट मत नोंदवत असतांना देखील शिवसेनेसोबतच राहून उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याचे त्यांनी उभ्या राज्याला दाखवून दिले आहे. असे असतांना देखील खा जाधवांच्या राजकीय कारकीर्दीवर आरोपाचे शिंतोडे उडविण्याची संधी विरोधक मात्र सोडतांना दिसत नाहीत हेही तितकेच खरे
म्हणे सुनेला आमदार करण्याचा खा जाधवांचा डाव
खा प्रतापराव जाधव यांचे बंधू स्व पंजाबराव जाधव यांचे ज्येष्ठ चिरंजीव योगेश जाधव यांची पत्नी अर्थात खा जाधव यांची नात्याने सून असणारी अमृता ही जन्माने मागासवर्गीय असून तिला आमदार करण्यासाठी खा जाधव राजकीय खेळी खेळत असल्याची जिल्हाभर चर्चा आहे. खा जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांचा प्रेमविवाह असून त्यांची पत्नी सौ अमृता वास्तविक कुणबी ( मराठा ) समाजाची आहे. योगेश चक विवाह हा 2019 ला झाला,त्यावेळी हितचिंतकांनी मुद्दाम वावड्या उठवत योगेश चि पत्नी अमृता ही मागासवर्गीय समाजाची मुलगी असल्याची अफवा उडविली होती. या अफवेला अनेक बड्या नेत्यांनी देखील चर्चेत घेऊन हे खरं असल्याचे अनेकांना सांगितले होते. यावेळी आ.संजय रायमूलकर यांनी केलेली बंडखोरी ही खा जाधवांना विश्वासात घेऊनच केलेली असावी अशी चर्चा संबंध जिल्ह्यात आहे. ना एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले तर खा जाधव यांना मंत्रिपद आणि हे बंड फसले तर आपसूकच आ संजय रायमूलकर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणे नाही व आपण उमेदवारी मिळू दिली नाही हा आरोप देखील माथी येणार नसल्याने खा जाधव स्वतःच्या सुनेला उमेदवारी मिळवून घेतील आणि चित भी मेरी,और पट भी मेरी ही खेळी खेळतील अशी चर्चा हेतुपुरस्सर पेरणे सुरू आहे.
मात्र वास्तविक खा जाधव यांची नात्याने सून असणारी अमृता ही मराठा ( कुणबी ) समाजाचीच असून“आर्किटेक्ट” असणाऱ्या अमृता चा शाळेचा दाखला देखील देशोन्नती जवळ प्राप्त झाला आहे.
एकूण केवळ खा जाधवांवर राजकीय आरोपाचे शिंतोडे उडवून त्यांच्यावर टिका करण्याची भूक विरोधकांकडून भागविल्या जात आहे हे तितकेच खरे !
*योगेश जाधव…महत्वाकांक्षी तरुण*
खा जाधव यांचा पुतण्या असलेला योगेश जाधव यांची राजकीय महत्वाकांक्षा कधी लपून राहलेले नाही. नगरपालिका निवडणुकीवेळी नगराध्यक्षपदा साठी थेट जनतेतून उभे राहण्यासाठी त्याने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मात्र त्याला त्याच्या या निर्णयापासून खा जाधव आणि जाधव कुटुंबीयांनी त्याला घरगुती बैठकीत व्यवस्थित समजावून सांगत त्याला उद्योगधंद्याला लावले. योगेश हा “आर्किटेक्ट” असून तो कमालीचा शार्प आहे. राजकीय आकलन,समीक्षण,चिंतन,मंथन, आणि योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याचे राजकीय कसब,संघटन कौशल्य आत्मसात असलेल्या योगेश चि राजकीय महत्वाकांक्षा पाहू जाता त्याच अभिलाशेपोटी त्याने मागासवर्गीय समाजातील तरुणीशी विवाह केला असा समज अनेकांचा झाला आणि त्याचा प्रेमविवाह असल्याने अनेकांना तसे वाटल्यानेच त्यातूनच ह्या अफवेचा जन्म झाला असावा
मात्र राजकारणात असलेल्या आणि एका बडे बाप का बेटा असलेल्या व्यक्तीने मेहकर पासून तर जिल्ह्यातील पत्रकारांजवळ ही बिनबुडाची भावना व आपला राजकीय अंदाज व्यक्त केला होता.