बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय जबाबदारी, मैत्रीपूर्ण संबंध, परस्पर विश्वास आणि समन्वयाच्या भावनेतून १९ मार्च रोजी येथील पोलीस कवायत मैदानावर अपर पोलीस अधीक्षक, खामगांव संघविरुध्द अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा संघ यांमध्ये समन्वय ट्रॉफी’ चे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये अपर पोलीस अधीक्षक संघ खामगाव हा समन्वय ट्रॉफीचा मानकरी ठरला आहे.
नाणेफेक जिंकून अपोअ संघ खामगांव यांनी प्रथम फलंदाजी घेतली. यामध्ये अपोअ खामगांव संघाने १० ओव्हरमध्ये ३ विकेटच्या मोबदल्यात ८१ धावा केल्या. त्यामध्ये अमोल कोळी यांनी १७ चेंडूमध्ये ३१ धावा, सपोनि सतीश आडे पो.स्टे. पिंपळगांव राजा यांनी १६ चेंडूमध्ये २१ धावांचे योगदान दिले.सचिन कदम उपविपोअ बुलढाणा यांनी २ विकेट, पोनि लांडे यांनी १ विकेट घेतली. तद्नंतर अपोअ संघ बुलढाणा यांनी व्दितीय फलंदाजी करतांना, १० ओव्हरमध्ये ६ विकेटच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या. सलामीला खेळण्यास आलेले पोनि लांडे यांनी ११ चेंडूत १७ धावा, सपोनि राहूल जंजाळ यांनी २१ चेंडूत २० धावा केल्या. थोरात यांनी ३ ओव्हरमध्ये २ विकेट, सपोनि आडे यांनी २, सपोनि शेळके यांनी २ अशा विकेट घेतल्या. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक संघ, खामगांव यांचा २ धावांनी विजय झाला.
सदर समन्वय ट्रॉफीमध्ये सारंग आवाड यांनी स्वतः सहभाग घेवून, धावते समालोचन करुन सहभागी दोन्ही संघाचे मनोबल वाढविले. स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलीस अधीक्षक आवाड यांचे हस्ते करण्यात आले. ‘समन्वय ट्रॉफी’ ही विजेता संघ अशोक थोरात यांचे नेतृत्वाखालील अपर पोलीस अधीक्षक संघ, खामगांव यांना प्रदान करण्यात आली. या वेळी अमोल कोळी उपविपोअ खामगांव, सचिन कदम उपविपोअ बुलढाणा, विलास यामावार उपविपोअ मेहकर, गिरीश ताथोड पोलीस उपअधीक्षक (मुख्या.), पोनि अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, पोनि आनंद महाजन प्रभारी अधिकारी जि.वा.शा. पोनि शांतीकुमार पाटील पो.स्टे. खामगांव शहर, पोनि अरुण परदेशी पो.स्टे. शिवाजीनगर, सपोनि मनिष गावंडे पो.स्टे. धाड, सपोनि अमोल बारापात्रे पो.स्टे जलंब, सपोनि श्रीधर गुट्टे पो.स्टे. सोनाळा, सपोनि सतीष आडे पो.स्टे. पिंपळगांव राजा, सपोनि. गणेश हिवरकर पो.स्टे. अंढेरा, सपोनि. निलेश लोधी पो.स्टे. बुलढाणा शहर, सपोनि युवराज रबडे पो.स्टे. किनगांव राजा, सपोनि. राहूल जंजाळ, सपोनि अमित वानखडे स्थागुशा बुलढाणा, सपोनि. निलेश शेळके रा.गु.अ. बुलढाणा, सपोनि. गजानन वाघ पो.स्टे. हिवरखेड, सपोनि, जितेंद्र आडोळे वाचक पोअबुलढाणा, पोउपनि, श्रीकांत जिंदमवार जिवाशा बुलढाणा तसेच खामगांव आणि बुलढाणा उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.
पोलिसाचे मन शरीर स्वस्थ हवे!
सततचे बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था परिस्थिती आणि क्लिष्ट अशा तपासांमध्ये पोलीसांचे शरीर आणि मन स्वस्थ असणे गरजेचे आहे. पोलीसांनी जमेल तेव्हा खेळांना प्राधान्य देऊन शारिरीक कसरती कराव्यात, असे विचार जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी यावेळी व्यक्त केले.