MaharashtraVidharbha

शेतकऱ्याच्या शेत, घरात घुसले दोन ते अडीच फूट पाणी!

– संपूर्ण शेताचे व घराचे झाले नुकसान

– गेल्या वर्षी सुद्धा सदर शेतकऱ्याचे दोन लाख रुपयाचे झाले होते नुकसान

– समृद्धी वाल्याने केली होती तुटपुंजी मदत

–  सतत सहा महिन्यापासून नाली घेण्यासाठी करत होतो पाठपुरावा

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा (दिलीप ठोसरे) – मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथील शेतकरी  किसन अंबादास लाटे, समिंद्रा बाई लाटे व अनिल लाटे यांचे शेत चायगाव शिवारात गट नंबर 122 मध्ये आहे.  हे शेत समृद्धी महामार्गाला लागून आहे. परंतु सदर शेतकरी हा समृद्धीचा लाभार्थी नाही , तरीसुद्धा समृद्धीच्या ठेकेदारांनी नाल्यांचे काम हे पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात दोन ते अडीच फूट पाणी तुंबलेले आहे. 

समृद्धी व रस्ते विकासमहामंडळ ( MSRDC) वाल्यांनी या रोडचे व संपूर्ण पुलाचे पाणी शेतक-याच्याक्षशेतात काढलेले आहे आणि ते पाणी वाहून जाणाऱ्या नाल्याचे काम न केल्यामुळे सदर शेतकऱ्याचे हे नुकसान झाले आहे. शेत काल दिनांक 26 जून रोजी उसनवार करून खत बी आणून पेरणी केले होते.  परंतु रस्ते विकास महामंडळ( MSRDC) , समृद्धीवाले, जिल्हा परिषद, या सर्वांना पावसाळ्याच्या अगोदरच आणून प्रत्यक्षात दाखविले होते परंतु त्यांनी लक्ष न देता त्यांच्या हलगर्जीपणामुळे सदर शेतकऱ्याच्या शेतात व घरात दोन फूट पाणी तुंबून भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे.  सदर एमएसआरडीसी( MSRDC) , समृद्धी, जिल्हा परिषद वाले, या सर्वांना वेळोवेळी आणून दाखविले की समृद्धीच्या पूर्ण पुलाचे पाणी आमच्या शेताकडे काढलेले आहे. हे पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सदर पुलाला लागून नाली घ्या व हे पाणी काढा वेळोवेळी त्यांना सांगून सुद्धा व व प्रत्यक्षात आणून दाखविले तरीही शेतकऱ्याच्या मागणीकडे एमएसआरडीसी ,( MSRDC) समृद्धीवाले, जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सुद्धा लक्ष दिलं नाही.  हलगर्जीपणा केला , म्हणूनच सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर खत बी आणि घरात पाणी घुसून भरपूर नुकसान झालेले आहे. असेच नुकसान गेल्यावर्षी सुद्धा सदर शेतकऱ्याचे झाले होते त्यामध्ये घरात व शेतात पाणी घुसून गहू डाळ-तांदूळ व आणखीनही घरातल्या सामानाची भरपूर नुकसान झाले होते. असेच नुकसान यावर्षी सुद्धा संपूर्ण शेतात पाणी तुंबून व घरात पाणी घुसून झालेले आहे. सदर शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन सदर शेतकऱ्याला झालेल्या नुकसानी पासून वाचवावे जेणेकरून सदर शेतकरी हा अपंग असून, त्यावर आत्महत्येची पाळी येणार नाही. यासाठी रस्ते विकास महामंडळ, समृद्धी वाले व जिल्हा परिषद वाले यांनी लक्ष द्यावे आणि सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी सदर शेतकऱ्याने केलेली आहे.‌ सदर शेतकऱ्याचे नुकसान रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी( MSRDC) व समृद्धीच्या अधिकारी व जिल्हा परिषद अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजी पणामुळे झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!