आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : शालेय मुलांना योग्य वयात संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षणा समवेत संत साहित्याचा अभ्यास घेणारा उपक्रम म्हंणून आळंदीत दिड वर्षांपासून सुरु असलेला ओळख ज्ञानेश्वरीची हा उपक्रम आता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यातील शिक्षण संस्थाचा सहभाग घेण्यात येत आहे. शैक्षणिक संस्थानी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आळंदी देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केले आहे.
या उपक्रमाचे नियोजनासह शैक्षणिक संस्थानचा सहभाग वाढविण्यासाठी आळंदीत सहभाग होत असलेल्या तसेच होऊ इच्छिणाऱ्या संस्थानची सुसंवाद बैठक आळंदी देवस्थानचे भक्त निवासात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपक्रमाचे मार्गदर्शक संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी दिली. या उपक्रमातून संत साहित्याचा प्रचार प्रसार शालेय मुलांचे माध्यमातून केला जाणार आहे. भावी पिढी संस्कारक्षम व्हावी तसेच त्यांना संत विचाराच्या अध्यात्माची ओळख, आवड निर्माण व्हावी यासाठी उपक्रमा राज्यातील शाळांत राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे. आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या संकलपनेतून आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक यांचे माध्यमातून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. गेल्या दिड वर्षांपासून येथील ज्ञानेश्वर विद्यालयात ओळख ज्ञानेश्वरीची उपक्रमा यशस्वीपणे सुरू आहे. या उपक्रमाची पाहणी आळंदी देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमास पालकांतून मोठा प्रतिसाद मिळाला असून मुलांचा सहभाग देखील वाढला आहे. शालेय अभ्यासक्रमा सोबत संत विचारांचा अभ्यास उपलब्द्ध करून देणाऱ्या हा आध्यात्मिक आळंदी पॅटर्न म्हंणून सर्वत्र ओळखला जाणार आहे. चेया उपक्रमाचे अनेक नामवंतांनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने सुसंस्कृत आदर्श व्यक्ती घडविण्याच्या उद्देशाने ओळख श्री ज्ञानेश्वरीची या एक संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत मुलांना मिळणार आहे. आध्यात्मिक आळंदी पॅटर्न म्हंणून ओळख ज्ञानेश्वरीची उपक्रमा सर्व शालेय शिक्षण संस्थांनी सुरु करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी सुसंवाद साधणाऱ्या बैठकांचे आयोजन केले होते. याच उपक्रमास गती देण्यासाठी अध्यात्मिक मूल्यसंस्कार रुजविणारा ओळख ज्ञानेश्वरीची हा संस्कारक्षम उपक्रम राज्यातील सर्व शाळांत राबविला जाणार आहे. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने रविवार ( दि.१९ )मार्च रोजी सकाळी ११ अकरा भक्तनिवास येथील सभागृहात शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष,पदाधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक,चरित्र समितीचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माऊलींच्या ज्ञानेश्वरीतून जीवन संस्कारक्षम घडविण्यासाठी उपक्रमा हाती घेत आळंदी देवस्थान पाठबळ देत आहे. राज्यातील शैक्षणिक संस्था चालकांनी आपल्या शाळेत उपक्रमा सुरू करण्यासाठी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
या संवाद बैठकीचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे आवाहन नुसार करण्यात आले आहे.