राहुल बोंद्रे स्वतःला ‘चिखलीचे राजे’ समजतात; आ. श्वेताताई महाले यांची बोचरी टीका!
– भाजप कार्यकर्ते श्याम वाकदकर मारहाण प्रकरण
– स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्याबद्दल नीतांत आदर असल्याची दिली ग्वाही
बुलढाणा (संजय निकाळजे)- चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काल भाजप कार्यकर्ते श्याम वाकतकर यांना वडील स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मारहाण केली. या प्रकरणासंदर्भात आज आमदार श्वेताताई महाले यांनी प्रतिक्रिया देऊन माजी आमदार राहुल बोंद्रे हे स्वतःला ‘चिखलीचे राजा’ समजतात. त्यांना वाटतं मी जे सांगेल तेच चिखलीकरांनी ऐकलं पाहिजेत. याच भावनेतून त्यांनी हे कृत्य केले आहे. मात्र त्यांनी जबाबदारीने वागले- बोलले पाहिजेत, असा सल्ला देत, संबंधित पोस्टच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वाचून दाखवली.
या मारहाण प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले असताना, आमदार श्वेताताई महाले यांनी कैलासवासी तात्यासाहेब बोंद्रे यांचेबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे. गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत नसतात आणि मीच काय माझ्या पक्षातील कोणीही असो, स्वर्गवासी तात्यासाहेब असतील किंवा कोणत्याही व्यक्ती असेल, त्या व्यक्तीबद्दल कोणी बोलत असेल तर त्याचे समर्थन मीही करत नाही. काल जो प्रकार आपल्या चिखली शहरांमध्ये झाला हा अतिशय दुर्दैवी प्रकारचा म्हणावा लागेल. काल वीस वर्षापासूनच्या विधानसभेचा पूर्ण अहवाल राहुल बोंद्रे यांनी दिला. सन्माननीय भारतभाऊ असतील, रेखाताई असतील यांच्या कार्यकाळामध्ये किंवा स्वतः राहुलभाऊ यांच्यासुद्धा कार्यकाळामध्ये असला प्रकार झाला नाही असे ते म्हणाले. पण मला या ठिकाणी आवर्जुन सांगावसं वाटतं की चिखली शहर हे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वळण देणार शहर राहिलेल आहे. चिखलीची संस्कृती त्या ठिकाणी महत्त्वाची राहिलेली आहे. त्या संस्कृतीचा मान प्रत्येकाने ठेवलेला आहे व जपण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला आहे. बरेचसे आमदार झाले, माजी झालेत परंतु रस्त्यावर येऊन अशा पद्धतीने येऊन कुठल्याही माजी आमदाराने कोणत्या व्यक्तीला मारलं नाही. विषय आहे सोशल मीडियामधील एका पोस्टचा. श्याम वाकतकर यांनी कुठली पोस्ट केली हे मला सांगण्यात आलं. आणि मी माहिती घेतली, सोशल मीडिया आहे, त्याचा चुकीचा वापर केला जातो. आणि राहुल बोंद्रे बोलले की जे पेरलं तेच उगवतं माझ्या बाबतीत कोरोनाच्या काळात माझी बदनामी करण्यासाठी त्यांनीही सोशल मीडियाचा वापर केला होता एका महिलेला हाताशी धरून. त्यावेळेस त्यांनी माझ्या व माझ्या पतीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे होऊ शकतं, सोशल मीडियामध्ये कोणी चुकीचा व्यक्ती त्या ठिकाणी बोलला असेल लिहिलं असेल. परंतु मी प्रतिक्रिया देण्याच्या आधी ती पोस्ट केलेली बघितली.
या पोस्टमध्ये लिहिलेल आहे स्वयंघोषित पदव्या विकणे आहे. समाजसेवकांना- समाजसेवक, उद्योजकांना- उद्योजक, तपश्चर्या करणार्यांना- ऋषीमुनी, सेवा उद्योग करणार्यांना- तुल्य असे आहे. आता यामध्ये स्वतः राहुल बोंद्रेंचा किंवा स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांचा कुठलाही संबंध नाही. परंतु काहीतरी अर्थ त्यांनी स्वतः मनामध्ये काढला. खरंतर ते म्हणतात की व्यक्ती द्वेषाचं राजकारण केल्या जातयं. परंतु व्यक्ती कोण करतयं हे त्यांच्याच कृतीतून दिसून आले. श्याम वाकदकर स्वतंत्र विचारसरणीचा असल्याने राहुल बोंद्रे जे सांगतील ते ऐकत नसल्याने त्यांचा द्वेष करत गेले. त्यामुळे काल त्यांना मारहाण करण्यात आली व त्या ठिकाणी त्यांचा दहावीतला मुलगा परीक्षा केंद्रावर असतानासुद्धा त्याचीदेखील त्यांना कीव आली नाही. राहुल बोंद्रे म्हणतात माझ्या वडिलांचा सोशल मीडियातून अपमान केला. ह्या रागामुळे त्यांनी रस्त्यावरती येऊन श्याम वाकदकारला मारलं, हल्ला केला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. खरंतर राहुल बोंद्रे चिखलीचे राजा समजतात. त्यांनी राजा समजावे कारण ते मोठे जमीनदार आहेत, मोठे संस्था चालक आहेत, कारखानदार आहेत, वडिलोपार्जित त्यांना सर्वकाही मिळालेला आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं आपण चिखलीचे राजे आहोत. आपण जे म्हणतो ते चिखलीतल्या लोकांनी ऐकायला पाहिजे. याच भावनेतून असे कृती त्यांनी केले. याआधी सुद्धा त्यांनी अशी कृत्य केलेले आहेत. त्यामुळे चिखलीकरना त्यांचा अनुभव आहे. खोटे बोल पण रेटून बोल हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांची हिम्मत वाढली आहे. त्यांनी सांगितलं श्याम वाकदकर हा श्वेता महाले यांचा पीए आहे. मात्र मी स्पष्टपणे सांगते की ते माझे पीए नाहीत, भाऊ आहे. आणि मतदारसंघातील लाखो तरुण माझे भाऊ आहेत.
एखाद्या भावावर अत्याचार होत असेल तर त्याची बहीण म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच राहुल बोंद्रे म्हणतात चिखलीमध्ये बदल झाला आहे. निश्चितच बदल आहे. मात्र तो विकासाचा व विकासाच्या माध्यमातून रस्ते जलजीवन मिशन, १२८ गावांना रस्ता हा विकास आहे. असे सांगून त्यांनी राहुल बोंद्रे यांना भ्याड हल्ला करून कायदा व सुव्यवस्था आपण हाती घेऊ नये, आपणही आमदार होते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहात. अशावेळी आपलं वागणं, बोलणं जबाबदारीचं असलं पाहिजे, असा सल्लाही शेवटी आमदार श्वेताताई महाले यांनी बोलताना दिला.
—————–