सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी शनिवारी सोलापुरात विराट महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चामध्ये हजारो कर्मचार्यांनी सहभाग नोंदवत, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, अशी आग्रहाची मागणी केली. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांच्या हातून माईक काढून घेतल्याने चर्चेचा विषय झाला.
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विराट महामोर्चाला सुरुवात झाली. तो थेट डफरीन चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. याप्रसंगी महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आला असता, महाविकास आघाडीचे नेते भाषण करीत असताना काही कर्मचार्यांनी गोंधळ घातला. यामध्ये विशेषता या जुनी पेन्शन योजनेच्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे काही नेतेमंडळी सहभाग घेऊन पाठिंबा दिला. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यास उठले असता काही वेळातच त्यांच्या हातून माईक काढून घेण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचे विष्णू कारमपुरी हेदेखील बोलण्यासाठी उठले असता कर्मचार्यांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या हातून माईक काढला. त्यामुळे कर्मचार्यांनी राजकीय पाठिंबा अप्रत्यक्षरीत्या नाकारण्याचा प्रयत्न तरी करीत नाही ना, असा प्रश्न याप्रसंगी पडला होता. सोलापूर शहर (मध्य)च्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. जे सरकार जुनी पेन्शन योजना लागू करीत नाही हे खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे आहे. प्रास्ताविक भाषण राम शिंदे यांनी व्यक्त केले. त्यानंतर इंदापुरे व काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे, प्रकाश यलगुलवार यांचीही भाषणे झाली.
जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, राजेश देशपांडे, अविनाश गोडसे, विवेक लिंगराज, नागेश पाटील, गिरीष जाधव, अतुल सरडे, टी आर पाटील, दिनेश बनसोडे, लक्ष्मण वंजारी, संतोष जाधव, नागेश धोत्रे, भिमाशंकर कोळी, दीपक चव्हाण, शहानवाज शेख, श्रीकांत मेहरकर, चेतन वाघमारे, योगेश हब्बू, अनिल जगताप, के. पी. शिंदे, एस. पी. माने, गणेश हुच्चे, ज्ञानदेव समदुर्ले, समीर शेख, वाय. पी. कांबळे, सचिन साळुंखे, आप्पाराव गायकवाड, संतोष शिंदे, प्रताप रूपनर, सचिन पवार, रफीक मुल्ला, सिद्धाराम बोरूटे आदी उपस्थित होते.
भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यावर आडम मास्तरांची टीका
देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व भाजप, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यावर माजी आमदार आडम मास्तर यांनी टीका केली. जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी नीक्षून सांगितले.
——————