BULDHANA

वर्षभरात ७ हजार नवीन पंपाना दिल्या वीजजोडण्या!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) –  महावितरणने अकोला परिमंडलाला घालून दिलेले  कृषीपंप वीज जोडणीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी नवीन वीज जोडणी देण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी अकोला, बुलढाणा आणि वाशिम येथील वीज जोडणीचे काम करणाऱ्या कंत्राटदार यांच्या आढावा बैठकीत दिले.

वीज जोडणीसाठी प्रतिक्षेत असलेल्या आणि ज्यांनी ३१ मार्च २०२२ पुर्वी अनामत रक्कम महावितरणकडे भरली आहे.अशा सर्वच कृषीपंप ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्याचे शासनाचे आणि महावितरणचे उध्दीष्ट आहे.त्यामुळे अकोला परिमंडलाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील वीज जोडणीच्या कामाला गती देण्यासाठी प्रादेशिक संचालक यांनी कंत्राटदार,महावितरण अधिकारी यांची संयुक्त बैठक घेत सविस्तर आढावा घेतला.  आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकुण ६ हजार ९२७ कृषींपपाना नविन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.यामध्ये अकोला जिल्ह्यातील १८६३,बुलडाणा जिल्ह्यातील २८४५ आणि वाशिम जिल्ह्यातील २२१९ कृषीपंपाचा समावेश आहे.परंतू अजूनही परिमंडलात ११ हजार ९९३ कृषीपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित आहे.त्यामुळे वीज जोडणीच्या कामात हयगय न करण्याचा सूचक इशाराही सुहास रंगारी यांनी यावेळी दिला.

यावेळी श्री रंगारी म्हणाले की, वितरीत केलेल्या वीजेच्या बिलावरच महावितरणचे अस्तित्व आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला अचूक वीजबिल गेले पाहिजे. त्यासाठी नॉर्मल बिलींग इफिशिएंन्शीचे प्रमाण ९५ टक्क्यापेक्षा जास्त वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे अशा स्पष्ट सुचना यावेळी त्यांनी कंत्राटदार व महावितरण अधिकाऱ्यांना दिल्यात. फॉल्टी मीटर मुळे महावितरणचे आर्थीक नुकसान होत असल्याने फॉल्टी मीटरचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजे,तसेच सरासरी वीज देयेकाचे प्रमाण हे ३ टक्क्यापेक्षा खाली आणण्याबरोबरच फोटो रिजेक्शनचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा कमी करण्याचे लक्ष यावेळी प्रादेशिक संचालकांनी घालून दिलेत. महावितरणच्या अकोला,बुलडाणा आणि वाशिम (दि.१६ व १७ मार्च ) झालेल्या प्रादेशिक संचालकाच्या आढावा बैठकीत महाव्यवस्थाक वित्त व लेखा शरद दाहेदार,अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य,कार्यकारीअभियंता ज्ञानेश पानपाटील,अश्विनी चौधरसह कंत्राटदार,एजन्सी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!