BULDHANAVidharbha

‘गव्हासोबत खडेपण’!; टॅक्स भरणारे, न भरणारे पाण्याला मूकणार!

मोताळा (प्रतिनिधी) – मोताळा नगर पंचायत मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे यांची बदली झाल्याने येथील नगर पंचायतचा पदभार बुलढाणा नगर परिषद सीओ यांच्याकडे देण्यात आला. पांडे यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांनी त्याच कर्तव्यदक्ष पणाचा मोताळा येथे आव आणीत नळाचे व्हॉल सोडविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर वसुली कमी असलेल्या प्रभागातील पाणी पुरवठा व्हॉल बंद ठेवण्याचा फतवा 9 मार्च रोजी जारी केला आहे. त्यामध्ये नळपट्टी न भरणाऱ्यांचे कनेक्शन बंद न करता उलट काढलेल्या फतव्यामध्ये जे नियमीत नळकर व घरपट्टी भरणारे आहेत त्यांनासुध्दा पाणी मिळणार नसल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे, ते सुध्दा भविष्यात नियमीत कर भरणा करतील काय? असा प्रश्न या अनुषंगाने सुज्ज्ञ नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.

मोताळा ग्रामपंचयातचे नगर पंचायतमध्ये रुपांतर होवून जवळपास 8 वर्ष झाली आहेत. परंतु मोताळा शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. दोन मुख्याधिकारी आले आणि गेले.  कोणी कमाई करुन तर एक काँग्रेसच्या काळात राजकीय झंझट नसल्यामुळे गेल्याची चर्चा आहे. मोताळा नगर पंचायतची घरपट्टी व नळपट्टी ही करोडोच्या घरात बाकी आहे. तसेच नगर पंचायतच्या गाळ्यांचे भाडे अनेकांकडे थकलेले आहे. कित्येकांनी तोंडी गाळे विकून, भाड्याने देवून पैसा कमाविला आहे.  गाळे ज्यांनी भाड्यांनी घेतलेले आहेत ते मूळ लोक त्या गाळ्यामध्ये धंदा करीत नसून ते इतरांच्या ताब्यात आहेत. शहरात अनेकांची घरे सिमेंट काँक्रीटची बांधलेली आहेत, त्यांची नगर पंचायतमध्ये टीनपत्राची नेांद असल्यामुळे नगर पंचायत प्रशासनाचे लाखोचे नुकसान होत आहे.  बाजारामध्ये अतिक्रमण वाढले असून लाखो रुपये खर्च कलेले आठवडी बाजारातील शौचालय बंद पडले असून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे.


कर्तव्यदक्ष ‘सीओ’ पांडे लक्ष देतील काय?

मोताळा शहराची सन 2011 च्या जनगणनेनुसार 10 हजार 331 लोकसंख्या होती, आजरोजी लोकसंख्या 15 हजाराच्यावर गेलेली आहे. सन 2021-22 वर्षामध्ये मोताळा शहरात 3751 मालमत्ता(घरे )असून त्यावर 65 लक्ष 34 कर वसुली क्रमप्राप्त असतांना 18 लक्ष 76 हजार रुपयांची वसुली झालेली असून 46 लक्ष 58 हजार रुपये बाकी आहेत. शहराची लोकसंख्या 15 हजाराच्यावर असतांना केवळ 3751 लोकांची घरे असून फक्त 1749 नळ कनेक्शन आहेत. त्यांची एकूण मागणी 62 लक्ष 24 हजार असतांना वसुली केवळ 12 लक्ष 18 हजार वसुल झाली असून 50 लक्ष 6 हजार रुपये बाकी आहेत, हे वैध कनेक्शन घेणाऱ्यांची यादी असून मोताळा शहरात किती अवैध कनेक्शन आहेत याची यादी मात्र मोताळा नगर पंचायत प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!