BULDHANACrime

मुख्य चौकात 85 हजारांची चोरी;घटना सीसीटीव्हीत कैद!

बुलढाणा ( प्रशांत खंडारे) – शहरातील हृदयस्थानी असलेला संगम चौक गजबजलेला असतो. मात्र या चौकातील गोपाल हॉटेलच्या जवळील लकी ज्यूस सेंटर मध्ये तब्बल 85 हजाराची चोरी झाल्याचे आज 9 मार्च रोजी सकाळी उघडकीस आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. नेमके काय काय चोरीला गेले याचा उलगडा वृत्तलिहेपर्यंत झालेला नाही. मात्र रात्री पोलिसांची गस्त नियमित सुरू असते का? असा प्रश्न आता निर्माण झाला असून, शहर पोलीस ठाण्यातील डिटेक्टिव ब्रँच केवळ नावालाच उरल्याची चर्चा सुरू आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यात नियूक्त केलेले डीबी (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथक केवळ नावालाच असल्याचे समोर येत आहे. मागील काही महिन्यात चोरी व लुटीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना चोरीचा तपास लावण्यात या पथकांना फारशे यश आलेले दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण असून या पथकांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी, घरफोडी, लुटमार, चैन चोरी सारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांकडून तात्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला जातो. या घटनांचा तात्काळ तपास लागावा, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका डीबी पथकाला नियूक्त केलेले आहे. या पथकात साधारण एका अधिकाऱ्यासह पाच ते सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  मात्र मागील काही महिन्यांपासून या पथकांची कामगिरी फारशी उल्लेखनीय नसल्याचे दिसून येत आहे.वारंवार एवढ्या घटना घडूनही डीबी पथक शांतच आहेत. त्यांच्या तपासाबद्दल आणि कामकाजावर आता संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेऊन डीबी पथकात बदलावाची गरज असल्याचे जाणकार बोलत आहेत. दरम्यान आजच्या 85 हजाराच्या चोरीच्या घटनेने याला पुष्टी मिळत आहे. लकी ज्यूस सेंटर मध्ये चोरीची घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. हे फुटेज डीबी पथकाने ताब्यात घेतले असून घटनास्थळी शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर व डीबी पथकाची टीम दाखल झाली होती. त्यांचा पुढील तपास सुरू आहे. मात्र या चोरीचा छडा किती दिवसात लागतो ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!