Breaking newsCinemaHead linesWorld update

महानायक अमिताभ बच्चन गंभीर जखमी

– हैदराबाद येथील तातडीच्या उपचारानंतर मुंबईत घरी उपचार सुरू

मुंबई/हैदराबाद (प्रतिनिधी) – बॉलीवूडचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे. हैदराबाद येथे ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात ८० वर्षीय अमिताभ हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या बरगड्याजवळील स्नायू फाटल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सद्या ते मुंबईतील जलसा या निवासस्थानी वैद्यकीय उपचार घेत आहेत.

आपल्या दुखापतीची माहिती अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग पोस्टद्वारे दिली होती. त्यानंतर त्यांच्या अपघाताबद्दल त्यांच्या चाहत्यांना कळले व सर्वांना धक्का बसला. हैदराबाद येथे ‘प्रोजेक्ट के ‘ या चित्रपटाचे शुटिंग सुरू असून, त्यातील एका अ‍ॅक्शन सीनदरम्यान अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या उजव्या बरगडीजवळील स्नायू त्यात फाटले गेले आहेत. अपघात झाला तेव्हा अमिताभ यांना श्वासदेखील घेता येत नव्हते. तसेच, ते भोवळ येऊन कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने हैदराबाद येथील एआयजी या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचार केल्यानंतर मुंबईत आणण्यात आले. सद्या त्यांच्यावर घरीच तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय उपचार करत आहेत. सद्या अमिताभ यांना हालचाल व श्वास घेण्यास त्रास होतच असून, वेदनाशमक व इतर औषधींच्या सहाय्याने ते थोडीफार हालचाल करू शकत आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!