BULDHANAKhamgaon

बोथा घाटात दोन दुचाकीस्वार ठार!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – जिल्ह्यात अपघातांच्या घटनेत वाढ होत असून, आज २६ फेब्रुवारीला रात्री बुलढाणा- खामगाव रोडवरील बोथा घाटात दुचाकीला अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. प्रवीण सुसर (जांब) आणि प्रवीण दळवी (येवता) या दोघांचा मृतकांमध्ये समावेश असल्याचे समजते.

बुलढाणा ते खामगाव मार्गावरील बोथा घाटात वाहने सुसाट वेगाने धावतात. रात्रीच्या वेळी तर रस्ता मोकळा असल्याने वेगाला मर्यादा राहत नाही. ज्ञानगंगा अभयारण्यातील या घाटात वाहने हळू चालविण्याचे आदेशित आहे. परंतु या नियमांची पायमल्ली दररोजच होते. परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.आज २६ फेब्रुवारीला रात्री आठ वाजताच्या दरम्यान या घाटात दुचाकी ला अपघात झाला असून अपघातग्रस्तांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हविण्यात आले परंतु, दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!