Head linesPachhim Maharashtra

नगर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध – महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहराच्या विकासासाठी खास करून उपनगरांत नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शहराच्या विकासासाठी मी, माझा पक्ष व आमचे नगरसेवक कटिबद्ध आहोत. राजमाता कॉलेनीतील सिमेंट रस्ता असेल किंवा बोल्हेगाव- नागापूर भागातील रस्ते असतील, आम्ही या भागात विकासकामांचा डोंगर उभा करू, असे प्रतिपादन महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांनी केले. नागापूर पुलाजवळील प्रभाग क्रमांक सातमधील राजमाता कॉलेनीतील अंतर्गत सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन महापौरांच्याहस्ते पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी या प्रभागाचे नगरसेवक तथा सभागृहनेते अशोक बडे, नगरसेविका कमलताई सप्रे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

राजमाता कॉलेनीतील अंतर्गत रस्ते सिमेंटचे करून देऊ, असे आश्वासन माजी आमदार तथा शिवसेना नेते स्व. अनिलभैय्या राठोड यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता सभागृहनेते अशोक बडे यांच्या माध्यमातून व आपल्या नेतृत्वात होत आहे. यानिमित्ताने भैय्यांचे स्वप्न आपण पूर्ण केले. भैय्या आता स्वर्गात असतील तर तेथून ते तुम्हाला आशीर्वाद देत असतील, अशा शब्दांत या कॉलेनीतील रहिवासी व ज्येष्ठ संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनी या सिमेंटीकरणाच्या कामासाठी माजी आ. अनिल राठोड यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली होती. तो धागा पकडून महापौर शेंडगे म्हणाल्या, की स्व. अनिलभैय्या राठोड यांनी नेहमीच राजकारणविरहित विकासकामे केलीत. आम्हीसुद्धा विकासकामांचा तोच वारसा पुढे नेत आहोत. बोल्हेगाव, नागापूर या उपनगरांसाठी जास्तीत जास्त निधी देऊन या भागात रस्ता, पाणीपुरवठा हे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. प्रत्येकाला पुरेसे पाणी पुरविण्यासाठी अमृत योजनादेखील राबविली जात असल्याचे महापौरांनी याप्रसंगी सांगितले.

सभागृहनेते अशोक बडे म्हणाले, की आम्ही विकासाचे राजकारण करतो. आपल्या प्रभागात रस्ते, पाणी पुरवठा, पथदिवे व इतर नागरीसमस्या असतील तर त्या मार्गी लावल्या गेल्या आहेत. राजमाता कॉलेनीत पहिल्यांदाच सिमेंटचा रस्ता होत आहे. येथील नागरिकांनी गेली दहा वर्षे त्रास सहन केला. पण, आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढेही कॉलेनीतील व या प्रभागातील विकासकामे वेगाने मार्गी लागतील, अशी ग्वाही सभागृहनेते बडे यांनी दिली. नगरसेवक दत्ता सप्रे म्हणाले, की काही राजकीय घडामोडींमुळे विकासाची कामे मार्गी लागताना वेळ लागला होता. परंतु, रोहिणीताई शेंडगे या महापौर होताच त्यांनी या भागाला निधी देताना हात मोकळा ठेवला आहे. त्यामुळे या प्रभागातील रस्त्यांची कामे पूर्ण होत आहेत. यापुढेही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व विकासकामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन दत्ता सप्रे यांनी केले. सुरुवातीला महापौरांसह सभागृहनेते बडे व सप्रे यांच्याहस्ते श्रीफळ फोडून सिमेंट रस्ता कामांचे थाटात भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज लाटे यांनी केले तर आभार सौ. भारती साळवे यांनी मानले.

याप्रसंगी कॉलेनीतील रहिवासी संजय उमाप, अक्षय गांधी, पुरुषोत्तम सांगळे, दिलीप लेकुरवाळे, संघर्ष साळवे, मनोज लाटे, दिलीप दरंदले, नारखेडे साहेब, राजू नारखेडे, वळवी साहेब, राजाभाऊ मोहिते, दीपक बाकले, सचिन नर्‍हे, मोहसीन भाई, अमोल कणसे, संदीप रोकडे, सुचित गारोळे, पठाण सर, आढाव साहेब, साठे साहेब, चोथे साहेब, ओंकार चोथे, मन्सूर सय्यद, राजू भिसे, सागर भिसे, दीपक घाटकर, कदम सर, रासने साहेब, बबन कोतकर, दिलीप पेटकर, आडकर साहेब आदींसह सौ. योगिता बकाले, सौ. संगिता लेकुरवाळे, सौ. मंगला आढाव, सौ. पूनम नारखेडे, सौ. मयुरी सोनवणे, सौ. भारती साळवे, श्रीमती अर्चना गारोळे, सौ. वंदना नारखेडे, सौ. मनिषा भिसे, सौ. हीना शेख, सौ. दरंदले ताई, सौ. कांचन कणसे, सौ. कदम ताई आदी रहिवाश्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!