Pachhim MaharashtraSOLAPUR

खान कॅम्पसचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शैक्षणिक, सामाजिक, देशभक्तीपर तसेच चालू घडामोडींवर नाट्य, नृत्य, गायन यांचे सादरीकरण करीत खान कॅम्पसचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. होटगी रोड येथील डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्यु. कॉलेज, खान कॅम्पस सोलापूर यांच्यातर्फे शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘हौसलों की उडान-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा स्मारक मंदिर याठिकाणी झालेल्या या न भूतो न भविष्यति अशा कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले.

शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणारे शिमी हे मराठी नाटक, कोव्हीडची आठवण करून देणारे म्युझिकल नाटक, युवक वर्गात सर्रास दिसणारी डिप्रेशनच्या समस्येवर नाट्य, मानवी पिरॅमिड, आई, वडील, शिक्षक या नात्यांचे महत्व सांगणारे नृत्य, रोजगाराच्या समस्या, स्त्री भ्रुण हत्या आणि इतर विषयांवर सादर केलेल्या नाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी बोलताना संस्थेचे प्रमुख डॉ. असदुल्लाह खान यांनी खान कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो आणि वार्षिक महोत्सव हा त्याचाच एक भाग असल्याचे नमूद केले. खान कॅम्पसच्यावतीने शैक्षणिक आणि समाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रा. अब्दुल जब्बार शेख, मुख्या. आसिफ इक्बाल, एजाज मंजूर आलम, युसुफ शेख, अ‍ॅड. आसिम बांगी, जयश्री सुतार, प्रा. डॉ. जमील दफेदार, प्रा. अख्तर नदाफ, शब्बीर शेख आदींना युनिक लाइफटाईम अचिव्हमेंट अवार्डने सन्मानित करण्यात आले.

सूत्रसंचालन प्राचार्य साद उल्लाह खान यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यात संस्थेचे सर्व विश्वस्त, प्र.प्राचार्य इबादूल्लाह खान, व्यवस्थापक साकिब सय्यद, मुख्याध्यापक अलसबा नदाफ, सीईओ आफताब मुल्ला, अब्दुल रहेमान शेख, पर्यवेक्षिका नफीस होटगी, रुहीना नल्लामंदू, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कष्ट घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!