Pachhim MaharashtraSOLAPUR

सोलापूर जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता हीच संत गाडगेबाबांना आदरांजली – सीईओ कोहिणकर

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय, पाणी गुणवत्ता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या कामामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शाश्वत काम करणे हीच संत गाडगेबाबा यांना अभिवादन ठरेल, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर हे बोलत होते. कोहिणकर म्हणाले की, जलसुरक्षक दैनंदिनीमधील माहिती अद्ययावत ठेवून सर्व जलसुरक्षक यांनी गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./ पा.व स्व.) , इशाधीन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) जावेद शेख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड, बांधकामचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संत गाडगेबाबा महाराज यांच्या वेशभूषेतील फुलचंद नागटिळक आदी उपस्थित होते.

प्रारंभी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे म्हणाले, संत गाडगे बाबा हे केवळ स्वच्छतेपुरते सिमित नाहीत तर त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलन असो की बाबांचे दशसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी शासन करीत आहे, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी सांगितले. यावेळी जलसुरक्षक दैनंदिनी २०२३ तसेच जल जीवन मिशन व क्षेत्रीय पाणी गुणवत्ता तपासणी संच (एफटीके ) विषयी पोस्टरचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील जलसुरक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून खेड ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक संतोष दारेकर , करकंब गावात शाश्वत स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविणारे स्वच्छतादूत, ज्ञानेश्वर नारायण दुधाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती बार्डी केंद्र पांढरे वाडी, तसेच रमेश खारे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली केंद्र उंबरे यांचे टीमचा गौरव करणेत आला. तसेच अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे समाजशास्त्रज्ञ आनंद मोची ,स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविणा-या मुख्याध्यापत दत्तात्रय बेदरे व सहशिक्षक विष्णू आसबे या शिक्षकांचा तसेच संत गाडगेबाबा महाराज यांच्या वेशभूषेतील फुलचंद नागटिळक यांचा स्वच्छतेविषयी जनजागृतीच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखा अधिकारी श्रीकांत मिरगाळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, संवाद तज्ञ सचिन सोनवणे, क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे, स्वच्छता तज्ञ प्रशांत दबडे, पाणी गुणवत्ता तज्ञ दिपाली व्हटे , मनुष्यबळ विकास तज्ञ शंकर बंडगर , अभियांत्रिकी तज्ञ मुकूंद आकुडे , सनियंत्रण व मुल्यमापन तज्ञ यशवंती धत्तुरे , प्रतिक्षा गोडसे , अर्चना कणकी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महादेव शिंदे यांनी केले तर आभार सचिन सोनवणे यांनी मानले.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!