BULDHANAChikhaliHead linesVidharbha

चिखलीची ज्ञानदा रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकणार!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – चिमुकल्यांना डान्सची आवड असते. अनेक लहान मुलं उत्तम डान्स करतात. पण त्या चिमुकल्यांच्या अंगात असलेली कला जगासमोर येत नाही. मात्र मुलांचे टॅलेण्ट अभिनेता अंकुश चौधरी ‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमामधून समोर आणत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीची कुमारी ज्ञानदा काळे ही या टीव्ही रियालिटी शोमध्ये झळकणार आहे. ज्ञानदा हिची टॉप १२ मध्ये निवड झाली आहे.

‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष ज्युनियर्सचा’ या धमाकेदार डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये ४ ते १४ वयोगटातील स्पर्धकांना आपले टॅलेण्ट सिद्ध करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने हक्काचा मंच उपलब्ध करुन दिला आहे. या टीव्ही शोमध्ये चिखली शहरातील दंतशल्यचिकित्सक डॉ.योगेश काळे व मीना काळे यांची सुकन्या ज्ञानदा काळे हीची टॉप १२ मध्ये निवड झाली आहे. पंच म्हणून सिनेअभिनेते अंकुश चौधरी, सुप्रसिद्ध नृत्य निर्देशक वैभव घुगे व फुलवा खामकर यांच्या टीमने ज्ञानदाची निवड केली. शनिवार व रविवार रोजी ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ती झळकणार आहे. चिखली शहरातील गोपाल साबळे यांचे सुप्रसिद्ध एस. बी. भरतनाट्यम नृत्यालयाची ती विद्यार्थिनी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!