– सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणी गठीत करण्याचे जिल्हाध्यक्षांचे आदेश
चिखली (शहर प्रतिनिधी) – आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुन्ने व केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केन्द्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, तसेच केंद्रीय संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाशबापू देशमुख यांच्या आदेशावरुन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रताप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता चिखली शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकारणी गठीत करण्याचे आदेश देवून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे यांनी सागितले.
संपूर्ण भारतात किमान २५ वर्षापासून कार्यरत असलेली एकमेव पत्रकारांची संघटना, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची महत्वपूर्ण बुलढाणा जिल्हास्तरीय मिटींग चिखली येथे शासकीय विश्रामगृह येथे १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुन्ने व केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केन्द्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, तसेच केंद्रीय संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाशबापू देशमुख यांच्या आदेशावरुन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रताप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटींग घेण्यात आली, या मिटींगमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकारणी गठीत करण्याचे आदेश जिल्हा अध्यक्ष प्रताप मोरे यांनी दिले. घाटावरील बैठक घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळूभाऊ वानखेडे देऊळगाव साकरशा, संजय निकाळजे चिखली, अनिल मंजुळकर मेहकर यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारांनी तळागाळातील लोकांना आपल्या लेखनीमधून न्याय कसा देता येईल हे प्रामुख्याने पाहिले पाहिजे. पत्रकरिता ही निःपक्ष असली पाहिजे, तसेच संघटना ही आपल्याला जिल्हामध्ये वाढली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार बाळू वानखेडे व संजय निकाळजे यांनीही पत्रकरांना संबोधित केले की, शाहू, फुले, आंबेडकर, यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वंचित अन्याग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी ही लेखणी अत्याचाराच्या विरोधात आसुड ओढवेल, तसेच माझ्या पत्रकारांना कोणी जाणूनबुजून फसवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पत्रकारांना सत्य लिहण्यासाठी धमकावत असेल तर आता आमची संघटना खपवून घेणार नाही. पत्रकारांच्या पाठीमागे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना खंबीरपणे उभी राहिल, असे सांगितले.
जिल्हाध्यक्ष प्रतापराव मोरे यांनी पत्रकारांना संबोधित केले की, संघटनेच्या हितासाठी काम करुन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. सर्वसामान्य माणसांच्या व पत्रकारांच्या समस्यांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्री आवाज द्या. तुमच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी लोकशाही मार्गाने व लेखणीच्या माध्यमातून भ्रष्टाचारांची लक्तरे वेशीवर टांगून त्यांना वठणीवर आणू, त्यासाठी अन्याय अत्याचाराविरोधात सर्वांनी एकजुटीने उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी आपणास लढा देयायचा आहे. यावेळी पत्रकार महेंद्र हिवाळे, रवि मगर, शेख अजहर, विशाल गवई, मयूर मोरे, मच्छींद्र मघाडे, आम्रपाल उत्तम वाघमारे, शुध्दोधन ओंकार गवई, सुनिल नामदेव मोरे, डॉ.गंगाराम उबाळे, कैलास आंधळे, अनिल मंजुळकर व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.